आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 100 कोटींच्या घराचा मालक आहे साऊथस्टार चिरंजीवी, हैदराबादमध्ये आहे आलिशान घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  साऊथस्टार चिरंजीवी आज 22 ऑगस्ट रोजी त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कोनीडेला शिवा शंकरा वरा प्रसाद असे चिरंजीवी यांचे मुळ नाव आहे. गेल्या तीन दशकापासून टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने राज्य करणारे चिरंजीवी आजही चित्रपटांत अभिनेत्याची भूमिका करतात हे विशेष. केवळ अभिनेतेच नाही तर राजकारणातही सक्रिय आहेत. 
 
चिरंजीवी यांचा जन्म मोगालथूर या आंध्रप्रदेश येथील लहानशा गावात झाला. त्यांचे वडील हे कॉन्सटेबल होते. त्यांचे सतत ट्रांसफर होत असल्याने चिरंजीवी यांचे बालपण त्यांच्या आजीआजोबांसोबत गेले. त्यांनी  निदादावोलु, गुर्जला, बापातला, पोन्नुरु, मंगलागिरी आणि मोगलतुरु या गावात त्यांच्या शाळा बदलत गेल्या. कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना अभिनयात आवड निर्माण झाली आणि त्यांनी चेन्नई येथील अॅक्टींग स्कुलमध्ये प्रवेश घेतला. 
 
आज तीन दशकांनंतरही चिरंजीवी यांची जादू चित्रपटसृष्टीत कायम आहे. हैदराबाद येथे वास्तव्यास असणारे चिरंजीवी यांचे घर अतिशय आलिशान आहे. आज त्यांच्या या घराबद्दल काही माहिती घेऊन आलो आहोत.
 
हैदराबादमध्ये आहे घर..
अभिनेता चिरंजीवी यांचे हैदराबाद येथे असणारे घर ज्युबिली हिल्स या पॉश परिसरात आहे. तेथे ते कुटुंबासह राहतात. असे म्हणतात की हे घर बांधण्यासाठी  चिरंजीवी यांनी खास एक डोंगर विकत घेतला होता. 
 
चिरंजीवी यांच्यासाठी लकी आहे हे घर
या घरात राहायला गेल्यानंतर चिरंजीवी यांना पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून चिरंजीवी यांचे चाहते या पुरस्काराची वाट पाहत होते मात्र या घरात राहायला गेल्यानंतर त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यामुळे हे घर त्यांना लकी आहे असे म्हणतात. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा या घराचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...