आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कापासून ते नागार्जुनच्या सूनेपर्यंत, सार्वजनिक ठिकाणी झाली या 17 अभिनेत्रींची छेडछाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शेट्टी,  समांथा रुथ प्रभु - Divya Marathi
अनुष्का शेट्टी, समांथा रुथ प्रभु
एन्टरटेन्मेंट डेस्कः महिलांसोबत दररोज फिजिकल एब्यूज आणि सेक्शुअल हॅरेसमेंटसारख्या घटना घडत असल्याचे समोर येते. मात्र याचा फटका सामान्यालाच बसला असे नाही, तर ग्लॅमरच्या झगमगाटात वावरणा-या अभिनेत्रींनादेखील बसला आहे. अलीकडेच दक्षिणेतील एका टीव्ही अभिनेत्रीसोबत सेक्शुअल हॅरेसमेंटचे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने तिच्या नकळत तिचा न्यूड व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करुन तिच्यासोबत शारीरिक संबध ठेवले.   

यापूर्वीही काही अभिनेत्रींना अशा घटनांचा सामना करावा लागला आहे. यातील काही अभिनेत्रींच्या तर चक्क प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अर्थातच हा प्रकार काही अतिउत्साही फॅन्सकडून केला गेला.  प्रमोशन असो वा एखादा इव्हेंट, सेलिब्रेटी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या फॅन्सला भेटण्यासाठी जात असतात. परंतु यात काही असेही उत्साही फॅन्स असतात, जे कळत-नकळत असा काही कारनामा करून जातात, ज्याची ते सेलिब्रेटी कल्पनादेखील करू शकणार नाही. विशेषत: अ‍ॅक्ट्रेसच्या बाबतीत असे प्रसंग नेहमीच घडत असतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ब-याचशा अशा अभिनेत्री आहेत ज्यांना अशा गलिच्छ प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. कोण आहेत, या अभिनेत्री जाणून घेऊयात..  
 
अनुष्का शेट्टी : मंदिराबाहेर चाहत्यांनी बळजबरीने केला स्पर्श करण्याचा प्रयत्न...
जून, 2015 मध्ये अनुष्का शेट्टी तिरुमाला मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना काही अतिउत्साही चाहत्यांनी तिला गराडा घातला. यावेळी चाहत्यांनी तिच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्नात एकमेकांना धक्काबुक्की केली. गर्दीतील काही जणांनी अनुष्काला बळजबरीने स्पर्शही करण्याचा प्रयत्न केला होता.  
 
समांथा रुथ प्रभु : तीन तरुणांनी तिरुपती येथे काढली होती छेड...  
तिरुपती येथे एका खासगी शोच्या इनॉगरेशनसाठी पोहचलेल्या समांथासोबत तीन मुलांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे समांथा प्रचंड घाबरली होती. तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे बघून तिन्ही आरोपी तेथून पसार झाले. 2011 मध्ये ही घटना घडली होती.

पुढील स्लाईड्सवर वाचा आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींना अशा घटनांना द्यावे लागले तोंड...
बातम्या आणखी आहेत...