आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीत दिसली अजय देवगणची ऑनस्क्रिन वाइफ, शेअर केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियामध्ये कामासोबत श्रियाने सुटीचा मनमुराद आनंद लुटला. - Divya Marathi
इंडोनेशियामध्ये कामासोबत श्रियाने सुटीचा मनमुराद आनंद लुटला.
'दृश्यम' या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरनचे बिकिनी फोटोज व्हायरल झाले आहेत. अलीकडेच ती अंडरवॉटर फोटोशूटसाठी इंडोनेशिया येथे गेली होती. येथील बांडा सी येथे तिने फोटो शूट केले आणि सोबतच आयलॅण्डवर एन्जॉयदेखील केले. स्वतः श्रियाने अंडरवॉटर फोटोशूटचे फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

टू-पीस बिकिनीत दिसली श्रिया...
श्रिया सरन एका फोटोत टू-पीस बिकिनीत दिसली. तिने फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, 'I can’t believe I did it. @anupjkat thank you for being the coolest under water Photographer. Please go check out this page , it’s for the ocean lovers @oneoceanonelove'.
 
तर एका दुसरा फोटो शेअर करुन ती लिहिले,'This picture was taken by the best photographer in the world'. आणखी एका फोटोला श्रियाने कॅप्शन दिले, 'Reflections #sunkissed'.

या चित्रपटांमध्ये झळकली आहे श्रिया..
श्रिया सरनने बॉलिवूडमध्ये 'मिशन इस्तांबुल' (2008), ' दृश्यम' (2015) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तर साऊथमध्ये ती 'संतोषम' (2002), 'टागोर' (2003), 'शिवाजी: द बॉस' (2007) 'कंदस्वामी' (2009) या चित्रपटांमध्ये झळकली.  

पुढील स्लाईड्सवर बघा, श्रिया सरनने शेअर केलेले खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...