Home »Gossip» South Actresses Not Success In Bollywood

हिट स्टारसोबत केले डेब्यू, तरीही बॉलिवूडमध्ये Flop ठरल्या साऊथ अॅक्ट्रेसेस

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 12:12 PM IST

  • अजय देवगण आणि अक्षय कुमारसोबत काजल अग्रवाल

एन्टरटेन्मेंट डेस्कः साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवू़मध्ये आघाडीच्या अभिनेत्यांसोबत डेब्यू केले खरे पण त्यांच्या पदरी अपयश आले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. काजलाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 जून 1985 रोजी जन्मलेली काजल बॉलिवूडमध्ये फ्लॉप पण साऊथ इंडस्ट्रीत हिट ठरली. काजलने अजय देवगणसोबत 'सिंघम' (2011) द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. याशिवाय तिने 'स्पेशल 26' (2013) आणि 'दो लफ्जों की कहानी' (2016) या हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ती अपयशी ठरली.

काजलला व्हायचे नव्हते अभिनेत्री...
साऊथ सिनेमांची सुपरस्टार काजलची अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. शाळा आणि कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर तिने ब्रँड मॅनेजमेंटमध्ये एमबीए करण्यासाठी प्रवेश घेतला. पण तिच्या नशीबात काही वेगळेच होते. महाविद्यालयीन काळात तिचा मॉडेलिंग क्षेत्रासोबत संबंध आला आणि त्यानंतर तिला सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. काजलने 2007 साली 'लक्ष्‍मी कल्‍याणम' या तेलगू सिनेमाद्वारे अभिनय प्रवासाला सुरुवात केली. चंदामामा' (2007), 'मगाधीर' (2009), 'पॉरुडु' (2008), 'अ‍तदिष्ट' (2008), 'डॉर्लिंग' (2010), 'ओम शांति' (2010), 'मिस्टर परफेक्ट' (2011), 'वीरा' (2011), 'बिजनेसमन' (2012) सह साऊथच्या अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले. सध्या काजलकडे बॉलिवूडमधून सिनेमांच्या ऑफर्स नाहीत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेल्या अभिनेत्रींविषयी..

Next Article

Recommended