आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मुलींची आई आहे अमिताभ बच्चनची ही अॅक्ट्रेस, गेल्या 21 वर्षांपासून आहे चित्रपटांपासून दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री माधवीने वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 सप्टेंबर 1962 रोजी हैदराबाद येथे माधवीचा जन्म झाला. साऊथ चित्रपटसृष्टीत अभिनयाची सुरुवात केल्यानंतर बॉलिवूडकडे वळलेल्या अभिनेत्रींमध्ये माधवीच्या नावाची गणना होते. पण गेल्या 21 वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर असून नवरा आणि तीन मुलींसोबत न्यूजर्सी येथे वास्तव्याला आहे. 
 
अमिताभ बच्चनसोबत केलंय बॉलिवूडमध्ये काम... 
एकेकाळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीची सुपरस्टार राहिलेल्या माधवीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. अमिताभ बच्चन स्टारर  'गिरफ्तार' या सिनेमात ती झळकली होती. या चित्रपटातील 'धूप में निकला न करो रूप का रानी...'  हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. याशिवाय माधवीने अमिताभ बच्चनसोबत 'अंधा कानून' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांमध्येही काम केले होते. माधवीला टीनएजमध्येच  'थूरपु पद्मारा' (1976) या तेलुगु चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. तिचा हा पहिलाच चित्रपट हिट ठरला होता. माधवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ेय 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.  

 पुढील स्लाईड्सवर वाचा, माधवीशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...  
बातम्या आणखी आहेत...