आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: काजलसह या दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केले सुपरस्टारसोबत बी टाऊनमध्ये पदार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः अभिनेत्री काजल अग्रवाल)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहेत 19 जून 1985 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री असलेल्या काजलला सिनेसृष्टीत करिअर करायचे नव्हते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने मॅनजमेंटमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला होता. मात्र तिच्या नशीबात काही वेगळेच होते. महाविद्यालयीन काळापासूनच काजल मॉडेलिंग क्षेत्रात होती. तेथेच तिला सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या.
काजलने तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्ये आपली वेगळी छाप उमटवली आहे. बॉलिवूडमध्ये सुपरस्टार्ससोबत काम करणा-या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये काजलच्या नावाचा समावेश आहे. काजलने अजय देवगण स्टारर 'सिंघम' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'लक्ष्मी कल्याण'मद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश
काजलने 2007 मध्ये 'लक्ष्मी कल्याणम' या तेलगू सिनेमाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. या सिनेमात कल्याण राम तिचा को-स्टारक होता. मुख्य अभिनेत्री म्हणून काजलचा हा पहिलाच सिनेमा होता. मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमा फारसा चालला नाही. याचवर्षी रिलीज झालेला 'चंदामामा' या सिनेमाने काजलला यशाची चव चाखायला मिळाली. सिनेमाने चांगला बिझनेस केला. 2009 मध्ये आलेला मगधीरासुद्धा हिट ठरला. 'पॉरुडु', 'अ‍तदिष्ट', 'डॉलिंग', 'ओम शांति', 'मिस्टर परफेक्ट', 'वीरा', 'सरोजा', 'गणेश जस्ट गणेश', 'बिजनेसमॅन', 'नायक', 'बादशाह', 'जिला', 'येवादु' हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
'सिंघम'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री
काजलने 'सिंघम'द्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या सिनेमात अजय देवगण तिचा हीरो होता. सिनेमा सुपरहिट ठरला आणि काजलला बॉलिवूडमध्ये ओळख प्राप्त झाली. त्यानंतर अक्षय कुमार स्टारर 'स्पेशल 26' मध्ये काजल झळकली.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घेऊया आणखी काही दाक्षिणात्य अभिनेत्रींविषयी ज्यांनी सुपरस्टार्ससोबत हिंदी सिनेमात काम केले आहे...