आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

127 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे साऊथचा हा सुपरस्टार, असे आहे कार कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबूने 9 ऑगस्ट रोजी वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकाराच्या रुपात करिअरची सुरुवात करणारा महेश बाबू तब्बल 127 कोटींचा मालक आहे. 2005 साला माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत त्याचे लग्न झाले. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हैदराबादच्या पॉश परिसरात महेश बाबूचा लग्झरी बंगला असून त्याची किंमत 11 कोटींच्या घरात आहे. शिवाय त्याच्याकडे कारचे मोठे कलेक्शन आहे. 
 
एका चित्रपटासाठी घेतो 18 ते 20 कोटी रुपये मानधन... 
महेश बाबू एका चित्रपटासाठी सुमारे 18 ते 20 कोटींच्या घरात मानधन घेतो.  90च्या दशकात बालकलाकाराच्या रुपात सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर मधल्या काळात महेश बाबूने कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सिनेमांपासून ब्रेक घेतला होता. 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटाद्वारे त्याने लीड हीरोच्या रुपात मोठ्या पडद्यावर डेब्यू केले होते. या चित्रपटात प्रीती झिंटा त्याची हीरोईन होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 'मुरारी' (2001), 'बॉबी' (2002), 'ओक्काडू' (2003), 'अर्जुन' (2004), 'पोकिरी' (2006), 'बिजनेसमन' (2012), 'आगदु' (2014), 'ब्रह्मोत्सवम' (2016) हे त्याचे गाजलेले दाक्षिणात्य चित्रपट आहेत. त्याच्या आगामी 'स्पाइडर' हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, महेश बाबूशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...  
बातम्या आणखी आहेत...