आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: क्रिकेटपटूच नव्हे, या स्पोर्ट्स स्टार्सनीसुद्धा केलंय अॅक्ट्रेसेसला डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, टेनिस स्टार लिएंडर पेस आणि मॉडेल रिया पिल्लई)
क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अफेअरच्या अनेक बातम्या आजवर आपण ऐकल्या आहेत. मात्र क्रिकेटर्सच नव्हे तर इतर स्पोर्ट्समध्ये नावाजलेल्या सेलिब्रिटींचीही बॉलिवूड अभिनेत्रींसोबतची प्रेमप्रकरणे गाजली आहेत. काही स्पोर्ट्स स्टार्सनी अभिनेत्रींसोबत लग्न करुन साताजन्माची गाठ बांधली तर काहींनी केवळ त्यांना डेट केले.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींचे नव्हे तर इतर स्पोर्ट्सशी संबंधित सेलिब्रिटी आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमप्रकरणाचे किस्से सांगत आहोत. सुरुवात करुयात प्रसिद्ध टेनिस स्टार लिएंडर पेसपासून
महिमासोबत रोमान्स
17 जून 1973 मध्ये कोलकाता येथे जन्मलेले लिएंडर पेस प्रसिद्ध आणि यशस्वी टेनिस खेळाडू आहे. त्यांनी अनेक सिंगल आणि डबल मॅच जिंकल्या आहेत. लिएंडर यांना मानाच्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगभरात भारताचे नाव उंचावणारे लिएंडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी यांच्यात बरेच दिवस प्रेमप्रकरण चालले होते. मात्र काही दिवसांतच त्यांच्या प्रेमाला दृष्ट लागली आणि लिएंडर यांनी महिमाच्या आयुष्यातून काढता पाय घेतला.
रिया पिल्लईसोबत लिव्ह इन रिलेशनशिप...
महिमासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर लिएंडर यांच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लईची एन्ट्री झाली. पेस आणि रियाची भेट आर्ट ऑफ लिव्हिंगच्या क्लासमध्ये झाली होती. येथे रिया त्यांची शिक्षिका होती. दोन वर्षात रिया पेस यांच्या मुलीची आई झाली. मात्र अद्याप दोघांनी लग्न केलेले नाही. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र आता दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. मुलीच्या कस्टडीवरुन दोघांमध्ये वाद सुरु आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्पोर्ट्स स्टारच्या लव्ह लाइफविषयी...