आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतेभावाच्या लग्नात व-हाडी बनल्या श्रीदेवीच्या मुली, सोनम-अर्जुनही थिरकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी त्यांचा आतेभाऊ अक्षय मारवाह आणि अशिता रेलन यांचे डेस्टिनेशन वेडिंग एन्जॉय करत आहेत. लग्नात व-हाडी बनून दोघींनी भरपूर डान्सदेखील केला. दोघीही मनीष मल्होत्राच्या डिझायन ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसल्या. या दोघींसोबतच अर्जुन कपूर आणि सोनम कपूर यांनीही ताल धरला. 

अनिल कपूरच्या बहिणीचा मुलगा आहे अक्षय... 
अक्षय मारवाह हा अनिल कपूर आणि बोनी कपूर यांची बहीण रीना यांचा मुलगा आहे. या लग्नात संपूर्ण कपूर कुटुंब सहभागी झालं आहे. या लग्नाचे अनेक फोटोज सोनम कपूर, रिया कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका खास फोटोत सोनम तिच्या बहिणी रिया कपूर, अंशुला कपूर (अर्जुन कपूरची बहीण) आणि शनाया कपूर (संजय कपूरची मुलगी) सोबत पोज देताना दिसतेय. हे लग्न अबू धाबीत झालं. 

पुढील स्लाईड्सवर बघा, अबू धाबीत झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...