मुंबई - अभिनेत्री श्रीदेवी नेहमी तिच्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते. नुकतेच श्रीदेवी सुनील शेट्टीची पत्नी मानाच्या चॅरीटी एक्झिबीशनमध्ये पोहोचली होती. या इवेंटमध्ये श्रीदेवी फारच सुंदर दिसत होती. या इव्हेंटमध्ये श्रीदेवी तिच्या लुकऐवजी तिच्या बॅगमुळेच जास्त चर्चेत राहिली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की श्रीदेवीच्या या बॅगची किंमत 8 लाख रुपये आहे. 8 लाख रुपयाच्या या बॅगच्या किंमतीत एक SUV गाडी येऊ शकते.
श्रीदेवीने घेतलेली ही बॅग हेर्मेस बिर्किन ब्रँडची आहे. या बॅगचे नाव इंग्लिश अभिनेत्री जेन बिर्किनच्या नावावर ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वात महाग लेदरपासून बनली आहे ही बॅग...
इवेंटमध्ये श्रीदेवीने आणलेल्या या बॅगेसाठी जगातील सर्वात महाग लेदर वापरण्यात आले आहे. या लेदरचे नाव आहे ऑस्ट्रिच लेदर. या कारणामुळे या बॅगची किंत जास्त आहे. इतकेच नाही तर या हॅगवर गोल्ड पॉलिशही आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, चॅरीटी शोमध्ये पोहोचलेल्या श्रीदेवीचे खास PHOTOS...