आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथूनला सोडून श्रीदेवीने वयाने आठ वर्षे मोठ्या असलेल्या बोनी कपूरसोबत थाटले होते लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने आज वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 'सदमा' या सिनेमात स्मृतीभ्रंश झालेल्या तरुणीची भूमिका असो, किंवा 'मिस्टर इंडिया' या सिनेमात 'हवाहवाई...' गाण्यावर थिरकून प्रेक्षकांना भूरळ घालणारी मनमौजी तरुणी असो, श्रीदेवीने सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
श्रीदेवी बी टाऊनची एक अशी अभिनेत्री आहे, जिने ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या दिलेखचक अदा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. 1996 मध्ये श्रीदेवीने आपल्या वयापेक्षा आठ वर्षे मोठे असलेल्या निर्माते बोनी कपूरसह लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. बोनी कपूरसह लग्न होण्यापूर्वी श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या अफेअर्सची चर्चा अगदी सर्वसामान्य होती. अनेक मॅगझिन्स आणि वृत्तपत्रांमध्ये मिथून आणि चक्रवर्ती यांच्या अफेअर्सच्या बातम्या प्रकाशित व्हायच्या.
वयाच्या चौथ्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण
13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात जन्मलेल्या श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षाची पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. एका तामिळ सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका वठवली होती. तेव्हा ही बालकलाकार एकेदिवशी इंडस्ट्रीतील नामावंत अभिनेत्री होईल, याचा विचार कदाचितच कुणी केला असावा. 1976 पर्यंत श्रीदेवीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बालकलाकाराच्या रुपात काम केले. मुख्य अभिनेत्री म्हणून 'मुंदरु मुदिची' या तामिळ सिनेमाद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये श्रीदेवीने 200 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी 63 हिंदी, 62 तेलगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम सिनेमांचा समावेश आहे. लग्नानंतर श्रीदेवीने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र जवळजवळ 15 वर्षांनी गौरी शिंदे दिग्दर्शित 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाद्वारे तिने फिल्मी दुनियेत कमबॅक केले. श्रीदेवीला सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय चालबाज आणि लम्हें या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.
'सोलहवां सावन'द्वारे केले होते बॉलिवूड डेब्यू...
श्रीदेवीने 1979मध्ये रिलीज झालेल्या 'सोलहवां सावन' या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. त्यामुळे ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत परतली. मात्र 1983 मध्ये 'हिम्मतवाला' या सिनेमाद्वारे तिने हिंदीत कमबॅक केले आणि हिंदीतील आघाडीची अभिनेत्री ठरली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमात तिच्यासह बॉलिवूडचे जंपिंग जॅक अर्थातच जितेंद्र मुख्य भूमिकेत होते.
नगीना, मिस्टर इंडिया आणि चालबाज, प्रत्येक सिनेमांमध्ये हटके अंदाज...
1986 मध्ये रिलीज झालेला 'नगीना' हा सिनेमा श्रीदेवीच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. या सिनेमात श्रीदेवीने इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील 'मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा...' या गाण्यात श्रीदेवीने आपल्या अद्भूत नृत्यशैलीचे दर्शन घडवले. खरं तर नाग-नागिण या फँटसीवर अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार झाले. मात्र कोणत्याच सिनेमाला 'नगीना'सारखे यश मिळू शकलेले नाही. 1987 मध्ये श्रीदेवीने आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा बॉलिवूडला दिला. या सिनेमाचे नाव होते 'मिस्टर इंडिया'. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यानंतर 1989 मध्ये श्रीदेवीच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा सिनेमा रिलीज झाला. तो होता 'चालबाज'. या सिनेमात श्रीदेवीने जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती.
1996 मध्ये बोनी कपूरसह लग्न करुन सर्वांना केले आश्चर्यचकित...
श्रीदेवीचे नाव अनेकदा तिच्या समवयीन अभिनेत्यांसह जोडले गेले होते. एकेकाळी श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती. 1996 मध्ये श्रीदेवीने बोनी कपूर यांच्यासह लग्न करुन आपल्या फॅन्स आणि बॉलिवूडला आश्चर्याचा मोठा धक्का दिला. असे म्हटले जाते, की श्रीदेवीला हे लग्न करायचे नव्हते. मात्र लग्नापूर्वीच ती गरोदर राहिल्यामुळे तिला बोनी कपूर यांच्याशी लग्न करावे लागले.
जान्हवी आणि खुशी या दोन मुलींची आहे आई
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना दोन मुली असून जान्हवी आणि खुशी ही त्यांची नावे आहेत. श्रीदेवी बोनी कपूर यांची दुसरी पत्नी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मोना सूरी कपूर होते. पहिल्या पत्नीपासून बोनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अर्जुन आणि अंशुला ही त्यांची नावे आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा श्रीदेवीची निवडक खास छायाचित्रे...