आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रीनिंगला \'बॉयफ्रेंड\'सोबत दिसली श्रीदेवीची मुलगी, याच तरुणाला जान्हवीने केले होते KISS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खान आणि आलिया भटच्या बहुचर्चित 'डिअर जिंदगी' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी बुधवारी ठेवण्यात आले होते. यावेळी श्रीदेवी मुलगी जान्हवी आणि पती बोनी कपूरसोबत स्क्रिनिंगस्थळी पोहोचली. कारमध्ये जान्हवीच्या शेजारी तिची आई आणि एक तरुण बसला होता. अद्याप हा मिस्ट्री बॉय नेमका कोण आहे, याविषयी अधिकृत काही सांगितले जात नाहीये. मात्र हाच जान्हवीचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा सर्वत्र रंगतेय. काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने जान्हवीसाठी लावला होता 'नो ब्वॉयफ्रेंड' रूल...
बातम्यांनुसार, श्रीदेवीची मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारेय. करण जोहरचा आगामी सिनेमा 'शिद्दत'द्वारे जान्हवीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड एन्ट्रीपू्र्वी जान्हवी कुठल्याही वादात सापडू नये, यासाठी श्रीदेवीने तिच्यावर काही बंधनं लादली आहेते. काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि तिचा कथित प्रियकर शिखर पहाडियाला किस करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झआली होती. पार्टीत क्लिक झालेल्या या फोटोज जान्हवी आणि शिखर यांच्यातील जवळीक स्पष्टपणे दिसली होती. हे फोटोज बघून श्रीदेवीचा पारा चढला होता. त्यामुळे तिने जान्हवीला बॉयफ्रेंडपासून दूर राहण्याची सक्त ताकिद दिली होती. पण आता हाच तरुण जान्हवी आणि तिच्या आईवडिलांसोबत डिअर जिंदगीच्या स्क्रिनिंगला सोबत पोहचल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

माजी मंत्र्यांचा नातू आहे शिखर पहाडिया...
शिखर मुळचा दिल्लीचा असून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
'डिअर जिंदगी'च्या स्क्रिनिंगला दिसली सेलिब्रिटींची मांदियाळी....
25 नोव्हेंबरला रिलीज होणा-या 'डिअर जिंदगी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला श्रीदेवी आणि तिच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त दीया मिर्झा, गौरी शिंदे, इम्तियाज अली, कोंकणा सेन, जुगल हंसराज, महीप कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, सोफी चौधरी, आदिती राव हैदरी, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी, पुनीत मल्होत्रा, कौसर मुनीर, सोनाली कुलकर्णी आणि बोमन इराणी हे सेलिब्रिटी पोहोचले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्रीदेवी-जान्हवी आणि स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...