आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेट नाइट पार्टी करताना कॅमे-यात कैद झाली श्रीदेवीची ही लाडकी लेक, पाहा HOT PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली यांच्यानंतर आता लवकरच एक स्टार किड बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असे दिसतेय. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवीविषयी. ती नेहमी सोशल साइट्स फेसबुक आणि ट्विटरवर आपली छायाचित्रे शेअर करुन लाइमलाइटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते.
अलीकडेच जान्हवीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये ती आपल्या मित्रांसोबत लेट नाइट पार्टी एन्जॉय करताना दिसतेय. डान्स फ्लोअरवर मित्रांसोबत थिरकणारी जान्हवी हॉट दिसतेय.
पहिल्यांदाच जान्हवीची लेट नाइट पार्टी एन्जॉय करतानाची छायाचित्रे समोर आलीत, असे नाही. यापूर्वीही काही मैत्रिणींसोबत पार्टीत धमाल मस्ती करतानाची तिची छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत. एकंदरीतच काय तर या मॅडमला लेट नाइट पार्टीत धमाल करणे पसंत असल्याचे दिसून येते.
जान्हवी अधूनमधून आपल्या आईसोबत पेज थ्री पार्टीजमध्येही हजेरी लावत असते. अनेकदा तिचा ग्लॅमरस अंदाज येथे पाहायला मिळाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पार्टी एन्जॉय करतानाची आणि सोशल साइट्सवर शेअर केलेली जान्हवीची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...