(खुशी कपूर पुर्वी आणि आत्ता)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज अनेकदांनी पाहिला आहे. एखाद्या इव्हेंट किंवा पार्टीत हजेरी लावत असताना जान्हवी
आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना मात देताना दिसते. आता श्रीदेवीची धाकटी कन्या खुशीसुद्धा आपल्या बहिणी आणि आईप्रमाणेच स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे.
अलीकडेच 'दिल धडकने दो' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला खुशी श्रीदेवीसोबत पोहोचली होती. यावेळी तिच्या अल्ट्रा मॉर्डन अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्यांदाचा खुशी एवढ्या स्टायलिश अंदाजात कॅमे-यासमोर आली. यापूर्वी मीडियात आलेल्या तिच्या छायाचित्रांमध्ये ती लठ्ठ दिसत होती. मात्र आता तिच्यात कमालीचा बदल झालेला दिसतोय. शिवाय पुर्वीपेक्षा आता ती उंचसुद्धा दिसतेय.
गुरुवारी खुशी आपल्या आईवडिलांसोबत आयफा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मलेशियाला रवाना झाली. त्यावेळी मुंबई विमानतळावर दुस-यांदा तिचा ग्लॅमरस अंदाज फोटोग्राफर्सनी कॅमे-यात कैद केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अलीकडच्या काळातील खुशीच्या ग्लॅमरस अंदाजाची खास झलक...