सुपरस्टार धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओल आज
आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. ओडिशी डान्सर आणि फॅशन डिझायनरच्या रुपात आपली ओळख निर्माण करणा-या अहानाचा जन्म 28 जुलै 1985 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूड स्टार्सची कन्या असूनदेखील तिने या क्षेत्रात आपली आवड दाखवली नाही.
अहाना अनेकदा आई हेमा आणि थोरली बहीण ईशासोबत एका मंचावर थिरकताना दिसली आहे. 2 फेब्रुवारी 2014 रोजी दिल्लीतील बिझनेसमन वैभव वोरासोबत तिचे लग्न झाले. यावर्षी जून महिन्यात अहानाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. फार क्वचित अहाना कॅमे-यासमोर येते.
व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या अहानाने 'ना तूम जानो ना हम' या एकमेव हिंदी सिनेमात स्पेशल अपिअरन्स दिला होता. 2002 मध्ये रिलीज झालेल्या आणि ईशा देओल, हृतिक रोशन, सैफ अली खान स्टारर या सिनेमात तिने ईशाच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये अशा काही स्टार डॉटर्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी सिनेसृष्टीत नव्हे तर दुस-या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, या स्टार्स डॉटर्सविषयी...