आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: हृतिकची भाची, टायगर श्रॉफची बहीण, लाइमलाइटपासून दूर आहेत हे स्टार किड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशनची भाची सुनारिका सोनी (डावीकडे) आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा)
मुंबईः अलीकडेच बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबराम आणि अक्षय कुमारने त्याची लेक निताराची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. अक्षय कधीकधी तर शाहरुख नित्यनेमाने सोशल साइट्सवर आपापल्या मुलांची छायाचित्रे शेअर करत असतात. याशिवाय ऐश्वर्या-अभिषेक बच्चनची लाडकी लेक आराध्या अधूनमधून आपल्या कुटुंबीयांसोबत आउटिंग करताना दिसत असते. मात्र काही स्टार किड्स असेही आहेत, ज्यांच्याविषयी मीडियात कधी फार चर्चा रंगत नाही. ब-याच स्टार मुलांविषयी सामान्यांना विशेष काही ठाऊकसुद्धा नाहीये. यापैकी काही शिक्षण घेत आहेत, तर काही सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार किड्सविषयी सांगत आहोत, जे लाइमलाइटपासून बरेच दूर आहेत.
सोनारिका सोनीः सोनारिका अभिनेता हृतिक रोशनच्या थोरल्या बहिणीची मुलगी आहे. हृतिकची बहीण सुनैनाची दोन लग्ने झाली आहेत. सोनारिका ही सुनैना आणि तिच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. खरं तर सोनारिका स्टार कुटुंबातील असूनदेखील लाइमलाइटपासून दूर आहे. ती आपल्या वडिलांसोबत राहते. मात्र रोशन कुटुंबात होणा-या फॅमिली फंक्शन्समध्ये ती सहभागी होत असते.
कृष्णा श्रॉफः अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची अलीकडेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. जॅकी यांना मुलगा टायगरसोबतच एक मुलगी असून तिचे नाव कृष्णा आहे. एक-दोनदा ती आपल्या वडिलांसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. मात्र सहसा ती मीडियापासून दूरच राहते. कृष्णा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, मात्र पडद्यावर नव्हे तर पडद्यामागे ती आपले करिअर करणार आहे. कृष्णाची दिग्दर्शिका व्हायची इच्छा आहे.
पु़ढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही स्टार किड्सविषयी...