आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखापासून श्रुती हासनपर्यंत, आईच्या लग्नापूर्वीच झाला होता या 7 CELEBS चा जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सध्या अभिनेत्री रेखाविषयी एक बातमी झपाट्याने पसरली आहे. रेखा तिच्या भांगात अभिनेता संजय दत्तच्या नावाचे कुंकू लावते, अशी चर्चा आहे. यासाठी यासिर उस्मान यांचे पुस्तक  'रेखा: द अनटोल्ड स्टोरी'चा संदर्भ देण्यात आला आहे. पण स्वतः उस्मान यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पुस्तकात असा कुठलाही उल्लेख नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोक पुस्तक नीट वाचत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

यासिर उस्मान यांच्या या पुस्तकात रेखाच्या जीवनाबाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रेखाच्या आई वडिलांच्या लग्नापूर्वीच रेखाची आई गर्भवती राहिली होती. रेखाची आई पुष्पावली तमिळ आणि तेलुगु चित्रपटांची अभिनेत्री होती. त्यांनी तमिळचे प्रसिद्ध अॅक्टर जेमिनी गणेशनबरोबर अनेक चित्रपट केले होते. त्याचदरम्यान दोघांचे अफेअर सुरू झाले. मात्र त्यांच्या लग्नानंतर रेखाचा जन्म झाला होता. त्यांना रेखा आणि राधा अशा दोन मुली होत्या.
 
श्रुतीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी केला कमल हसन सारिकाने विवाह 
श्रुती हसन साऊथचा प्रसिद्ध अभिनेता कमल हसन आणि सारिका यांची मुलगी आहे. कमल हसन पहिली पत्नी (वानी) बरोबर घटस्फोटानंतर सारिकाबरोबर राहत होते. त्यानंतर सारिका प्रेग्नंट असल्याच्या बातम्या समोर आल्या. 28 जानेवारी, 1986 ला श्रुती हसनचा जन्म झाला. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी सारिका आणि कमल हसन यांचा विवाह झाला. 

अशाच आणखी काही सेलिब्रिटी डॉटर्सबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...