आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हे CELEBS दुस-यांदा अडकले लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता आणि राजनेता राज बब्बर आज आपला 63वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज बब्बर यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या टुंडला जिल्ह्यात २३ जून १९५२ रोजी झाला. त्यांनी आग्रा कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले. त्यांनी बॉलिवूमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणा-या सेलेब्समध्ये राज बब्बर यांची गिणती होते.
एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांनी 1977मध्ये 'किस्सा कुर्सी का' सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. त्यांना पहिले यश 1980मध्ये आलेल्या 'इन्साफ का तराजू' सिनेमातून मिळाले. शिवाय, त्यांनी अनेत सिनेमांमध्ये काम केले.
राज यांचे सिनेमे-
राज बब्बर यांनी 'इन्साफ का तराजू', 'हम पांच', 'राज', 'पूनम', 'प्रेम गीत', 'निकाह', 'अरमान', 'दूल्हा बिकता है', 'जीवनधारा', 'अर्पण', 'मजदूर', 'आज की आवाज', 'बॉडीगार्ड', 'कर्ज', 'फॅशन', 'साहब बीवी और गँगस्टर' 'बुलेट राजा'सह अनेक सिनेमांत काम केले. त्यांनी नायकासोबत खलनायकाचीसुध्दा भूमिका साकारल्या आहेत.
स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न-
राज बब्बर विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा जाहिर आहे. अभिनेत्री स्मिता पाटीलसोबत त्यांच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या. विवाहित असूनदेखील त्यांनी नादिराला घटस्फोट न देताच स्मिता पाटीलसोबत लग्न केले. मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही. कारण स्मिता यांनी मुलगा प्रतीकला जन्म देताच जगाचा निरोप घेतला. त्यानंतर राज बब्बर पहिली पत्नी नदिराकडे परतले.
राजकारणात सक्रिय-
सिनेमांसह राज बब्बर राजकिय क्षेत्रातसुध्दा सक्रिय आहेत. 14व्या लोकसभा निवडणूकीत फिरोजाबादमधून समाजवादी पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले. परंतु 2006मध्ये समाजवादी पार्टीमधून निलंबित झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. 2014च्या लोकसभा निवडणूकीत ते गाजियाबाद येथून निवडणूक लढले, परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशा काही स्टार्सविषयी ज्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरे लग्न केले...