आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचे वडील, मेहनतीने सुनील शेट्टीने बनवले हे आलिशान घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेता सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील त्याच्या वडिलांच्या अतिशय जवळ होता. एका मुलाखतीत सुनील शेट्टीने सांगितले होते, की त्याचे वडील एकेकाळी रेस्तराँमध्ये प्लेट स्वच्छ करण्याचे काम करायचे. 

वयाच्या नवव्या वर्षी वडिलांनी सुरु केले होते काम...  
सुनीलचे वडिलांवर जीवापाड प्रेम होते. 2013 साली एका नवून डेकोरेशन शोरुमच्या उद्धाटन समारंभाच्या वेळी सुनील शेट्टीने सांगितले होते, की ही तिच जागा आहे, जेथे माझे वडील काम करायचे. वरळीस्थित एका रेस्तराँमध्ये सुनीलचे वडील वेटर होते आणि प्लेट स्वच्छ करायचे काम करत होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वडिलांनी काम सुरु केल्याचे सुनीलने यावेळी सांगितले होते. दीर्घ संघर्षानंतर 1943 साली सुनील शेट्टीच्या वडिलांनी एक संपूर्ण इमारत खरेदी केली होती. ही इमारत वरळीस्थित फोर सीजन हॉटेलच्या शेजारी आहे.  

वडिलांच्या व्यवसायाला सुनीलने नेले यशोशिखरावर...  
90च्या दशकात सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. सुनीलला बी टाऊनमधील सर्वात स्मार्ट बिझनेसमन म्हटले जाते. सिनेमांव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात त्याचा व्यवसाय पसरला आहे.  संपूर्ण देशात त्याच्या फिटनेस सेंटरची चेन आहे. पॉपकॉर्न एन्टरटेन्मेंट नावाच्या प्रॉडक्शन हाऊसचा तो मालक आहे. मुंबईत त्याची मिसचीफ नावाची बुटीक चेन आहे. वेंचर एस 2 रिअॅलिटी नावाने त्याची रिअल इस्टेट कंपनी आहे. सोबतच मुंबईत त्याचे अनेक रेस्तराँ आहेत.  

6200 sqft मध्ये पसरलेल्या लॅव्हिश व्हिलाचा मालक आहे सुनील शेट्टी... 
देशातील अनेक शहरांमध्ये सुनीलचे रेस्तराँ आणि हॉटेल्स आहेत. सोबतच खंडाळ्यात 6200 sqft चा लॅव्हिश व्हिला आहे. मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या खंडाळ्यात त्याचे हे लग्झरी होम आहे. हा व्हिला सुनील शेट्टीची कंपनी s2 रिअॅलिटी अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने कन्सट्रक्ट केला आहे. घराचे आर्किटेक्ट अभिनेता जॉन अब्राहमचा भाऊ एलन याने केले आहे. तर इंटेरिअर आणि फर्नीचर सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी हिने केले आहे. या लॅव्हिश व्हिलामधअये प्रायव्हेट गार्डन, स्वीमिंग पूल, डबल हाइटचे लिव्हिंग रूम, 5 बेडरूम, किचन आहे. याचे आकर्षणाचे केंद्रबिंदू डायनिंग रूम असून ते पूललगत आहे.  

आतून कसा दिसतो सुनील शेट्टीचा हा लॅव्हिश व्हिला, फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...