आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day : सोहासह या अॅक्ट्रेसेस आहेत शाही कुटुंबातून, पाहा कोण कोण आहे यादीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खआन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत 4 ऑक्टोबर 1978 रोजी प्रसिद्ध क्रिकेटर दिवंगत मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या घरी सोहाचा जन्म झाला.
 
'रंग दे बसंती', 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स', 'दिल मांगे मोर' या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवणा-या सोहाने 25 जानेवारी 2015 रोजी बॉयफ्रेंड आणि अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले. नुकतीच ती एका मुलीची आईही बनली आहे. 2009 मध्ये 'ढुंढते रह जाओगे' या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. तीन वर्षे डेट आणि नंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. राजघराण्याशी आहे सोहाचे नाते
सोहा अली खान पतौडी घराण्यातील सदस्य आहे. तिचे वडील नवाब पतौडी एकेकाळी भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार होते. तिचे पणजोबा इफ्तीखार अली खान पतौडी आठवे नवाब होते. तिचे पणजी साजिदा सुल्तान भोपाळची बेगम होती. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा सैफ अली खान पतौडी घराण्याचा नवाब झाला आहे. सोहासोबतच बी टाऊनच्या आणखी काही अभिनेत्री राजघराण्यातून इंडस्ट्रीमध्ये आल्या आहेत. परंतु त्यांनी या स्टेटसला करिअरपासून दूरच ठेवले.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या अभिनेत्री राजघराण्यातून बॉलिवूडमध्ये आल्या..
 
 
बातम्या आणखी आहेत...