आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणितीच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक स्टार पूर्वी होते लठ्ठ, नंतर बनले Fat To Fit

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणिती चोप्रा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 ऑक्टोबर 1988 रोजी अंबाला, हरियाणा येथे जन्मलेल्या परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (2011) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख ही 'इश्कजादे' या सिनेमातून मिळाली. परिणीतीने 'शुद्ध देसी रोमान्स', 'हंसी तो फंसी' आणि 'दावत ए इश्क' यासह अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. 

पहिल्या सिनेमाच्या वेळी बरीच लठ्ठ होती परिणीती...
परिणीती 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमात लठ्ठ दिसली होती. मात्र या सिनेमानंतर आपली फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी परिणीतीने वजन कमी करण्याचे ठरवले. जेव्हा तिचा 'इश्कजादे' हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा तिच्यात बराच फरक दिसून आला होता. आता तर ती अगदी फिट झाली आहे.

एका मुलाखतीत परिणीती म्हणाली होती, "काही वर्षांपूर्वी मी जगासमोर एक लठ्ठ आणि चाइल्डिश मुलगी होती. आता चार वर्षांनी मला जे व्हायचे होते, ती मी झाली आहे. मी इतरांना आव्हान करते, की त्यांनीसुद्धा माझ्यासारखे फिट व्हावे. कारण मला विश्वास आहे, की जर मी फिट बॉडी बनवू शकते, तर तुम्हीसुद्धा नक्कीच करु शकता."

परिणीतीच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी बरेच लठ्ठ होते. यामध्ये अर्जुन कपूर, त्याची चुलत बहीण सोनम कपूर यांच्याही नावाचा समावेश आहे. सिल्व्हर स्क्रिनवर या स्टार्सची जादू चालत आहे. याशिवाय परिणीती चोप्रा, जॅकी भगनानी, अध्ययन सुमन ही यंग ब्रिगेडदेखील सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी बरीच लठ्ठ होती. मात्र आता त्यांनी आपले अव्वाच्यासवा वजन कमी केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या स्टार्सविषयी...
सोनाक्षी सिन्हाने कमी केले 30 किलो वजन
सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन तब्बल 90 किलो होते. करिअरच्या दृष्टीनेल सोनाक्षीने आपले वाढलेले वजन बरेच कमी केले. सलमान खानच्या सांगण्यावरुन तिने स्वतःचे वजन कमी केले होते. 'दबंग' सिनेमाच्या शुटिंगपूर्वी सोनाक्षीने 30 किलो वजन कमी केले होते. 'तेवर' या सिनेमासाठी सोनाक्षीने जिममध्ये बरीच मेहनत घेतली होती. आता सोनाक्षी अगदी फिट दिसते आणि आपल्या फिटनेसवर ती काम करते.

100 किलो होते जरीन खानचे वजन 
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जरीन खानचे वजन 100 किलो होते. त्यामुळे भविष्यात कधी अॅक्ट्रेस होईल, असा स्वप्नातही तिने कधी विचार केला नव्हता. 2010 मध्ये सलमान खानच्या अपोझिट वीर सिनेमात जरीनला ड्रीम रोल मिळाला. यासाठी जरीनने तिचे 30 किलो वजन कमी केले. मात्र इथवरच तिला थांबून चालणार नव्हते. जरीनला वाढत्या वजनामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. नंतर अगदी फिट होण्यासाठी तिने योगा, कार्डिओ बुटकँप आणि स्पेशल वेट लॉस ट्रेनिंग घेतले. याचा परिणाम म्हणजे जरीन आता अगदी फिट झाली आहे. एका मुलाखतीत जरीन म्हणाली होती, मी माझे वजन स्वतःसाठी नव्हे तर मीडियासाठी कमी केले आहे. कारण तुम्ही सगळे मला सतत क्रिटिसाइज करत होते.

एकेकाळी 86 किलो होते सोनम कपूरचे वजन 
सोनम कपूरला स्टाईल आयकॉन म्हणून ओळखले जाते. 'सावरिया' या पहिल्या सिनेमाच्या वेळी सोनम कपूरचे वजन 86 किलो होते. मात्र नंतर तिने 30 किलो वजन कमी करुन स्वतःला सेक्सी बनवले. सोनम याकाळात बॉलिवूडची सर्वाधिक फिट अॅक्ट्रेस आहे. शिवाय तिच्या ड्रेस सेन्सचेही विशेष कौतुक होत असते. 

आलियाने कमी केले 16 किलो वजन 
महेश भट आणि सोनी राजदान यांची लाडकी कन्या आलिया भट हिने स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री  घेतली आणि पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बबली गर्ल म्हणून ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. स्टुडंट ऑफ द इयर'नंतर आलियाने एकामागून एक हिट सिनेमे दिले. पडद्यावर अतिशय ग्लॅमरस दिसणारी आलिया एकेकाळी गोलमटोल होती, यावर तुमचा विश्वास बसेल का... मात्र हे खरे आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आलिया बरीच लठ्ठ होती. तिचे वजन 67 किलो होते. मात्र सिनेमाची ऑफर आल्यानंतर तिने आपल्या फिगरवर लक्ष केंद्रित केले आणि तीन महिन्यांत 16 किलो वजन कमी करुन पडद्यावर अवतरली. वरील छायाचित्र बघून तुमच्या लक्षात येईल की आलिया भट बरीच लठ्ठ होती.

करीना कपूर बनली झिरो फिगर क्वीन... 
बी टाऊनमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड आणणारी अभिनेत्री करीना कपूरसुद्धा खूप लठ्ठ होती. मात्र 'टशन' सिनेमाच्या वेळी करीनाने आपल्या फिगरवर विशेष लक्ष दिले आणि झिरो साईज फिगरमुळे तिने एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली होती.

अदनान सामीने कमी केले 160 किलो वजन 
2007 साली गायक अदनान सामीने सर्वांना त्याच्या नव्या लूकने हादरून टाकले. अंदाजे 230 किलो वजन असणा-या अदनान सामीने तब्बल 160 किलो वजन वर्षभरात घटवून 70 किलो केले.

प्रेग्नेंसीच्या काळात लठ्ठ झाली होती ऐश्वर्या 
मुलगी आराध्याच्या जन्मानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे वजन झपाट्याने वाढले होते. विशेष म्हणजे आराध्याच्या जन्मापूर्वी म्हणजे 'धूम 2' साठी ऐश्वर्याने आपले तब्बल दहा किलो वजन कमी केले होते. आराध्याच्या जन्मानंतर मात्र तिचे वजन बरेच वाढले होते. पण लवकरच तिने आपल्या वजनावर नियंत्रण मिळवले आणि ती पुर्वीच्या रुपात परतली. 'जज्बा' या सिनेमाद्वारे ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले.

ईशा देओलसुद्धा होती लठ्ठ 
तुम्हाला 'धूम' सिनेमातील दिलबरा तर नक्कीच आठवत असेल ना. या सिनेमात ईशाने बिकिनी परिधान करुन स्वतःचे सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले होते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची मुलगी ईशाने 'कोई मेरे दिल से पुछे' या सिनेमानंतर अभिनयापेक्षा स्वतःच्या बॉडीवर विशेष लक्ष दिले. त्यामुळेच 'धूम' सिनेमात ईशा खूपच आकर्षक दिसली होती.

110 किलो होते अध्ययन सुमनचे वजन 
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन बी टाऊनमध्ये आपले पाय रोवण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. आज तो आपल्या वडिलांप्रमाणे अगदी फिट दिसतो. मात्र एकेकाळी अध्ययनसुद्धा बरा लठ्ठ होता. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अध्ययने वजन 110 किलो होते, नंतर त्याने आपले वजन बरेच कमी केले.

अर्जुन कपूरचे होते 170 किलो वजन 
'इश्कजादे' या सिनेमाद्वारे अभिनेता अर्जुन कपूरने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. मात्र सिनेमात येण्यापूर्वी अर्जुनने फिटनेसवर बरीच मेहनत घेतली. अर्जुनचे वजन 170 किलो होते. सलमानच्या मार्गदर्शनात त्याने 68 किलो वजन केले.  

120 किलो होते करण जोहरचे वजन 
सडपातळ दिसणारा बॉलिवूडचा आघाडीचा निर्माता करण जोहरचे लहान असताना वजन 120 किलो होते. करणचा डावीकडील हा फोटो 1999 मधील आहे. तसेच, करणने अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेल्वेट' सिनेमासाठी 10 किलो वजन कमी केले.

जॅकी भगनानीने कमी केले 80 किलो वजन 
बी टाऊनमध्ये अद्याप यशाच्या प्रतिक्षेत असलेला जॅकीसुद्धा एकेकाळी बराच लठ्ठ होता. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याचे वजन 130 किलो इतके होते. मात्र जीममध्ये घाम गाळून जॅकीने आपले वजन 80 किलोने कमी केले. यादरम्यान त्याने डाएटवरसुद्धा विशेष लक्ष दिले.
बातम्या आणखी आहेत...