आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे दीपक तिजोरींची Glamours मुलगी, 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समारा तिजोरी (इनसेट दीपक तिजोरी) - Divya Marathi
समारा तिजोरी (इनसेट दीपक तिजोरी)
मुंबई - 1990 मध्ये रिलीज झालेला सुपरहिट म्युझिकल चित्रपट 'आशिकी' द्वारे लाइमलाइटमध्ये आलेला अभिनेता दीपक तिजोरी 55 वर्षांचे होताहेत. 28 ऑगस्ट 1961 मध्ये जन्मलेल्या दीपक तिजोरी यांनी जो जिता वही सिकंदर, पहला नशा, कभी हां कभी ना, राजा नटवरलालसह अनेक चित्रपटांत काम केले आहे. अॅक्टींगबरोबरच त्यांनी प्रोडक्शन आणि डायरेक्शनही केले आहे.

20 वर्षांची मुलगी..
दीपक तिवारी यांनी त्यांची डिझायनर गर्लफ्रेंड शिवानी तनेजा बरोबर विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी समारा हिचे वय जवळपास 20 वर्ष आहे तर त्यांच्या मुलाचे नाव करण आहे.

13 व्या वर्षी झाली होती किडनॅप
दीपक तिजोरी यांना त्यांची पर्सनल लाइफ अत्यंत पर्सनल ठेवायला आवडते. तो मीडियाशी फारसा बोलत नाही तसेच फॅमिलीबरोबर फारश्या कार्यक्रमांमध्येही तो सहभागी होत नसतो. दीपक तिजोरींची मुलगी जेव्हा 13 वर्षांची होती, त्यावेळी तिला काही तासांसाठी किडनॅप करण्यात आले होते. 10 मे 2009 ला झालेल्या या अपघाताबाबत दीपक तिजोरी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, लोखंडवालाच्या रस्त्यावरून जाताना काही लोकांनी तिला ऑटोत बसवून एका हॉटेलात नेले होते. मात्र त्यांची मुलगी त्यांच्या तावडीतून पळून आली होती.

वरुण-जॉनच्या चित्रपटाशी संलग्न
समाराच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिला चित्रपटसृष्टीबाबत आवड असल्याचे स्पष्ट होते. वरुण धवन आणि जॉन अब्राहमच्या नुकत्याच आलेल्या 'ढिशूम' चित्रपटाशीही समारा संलग्न होती. सेटचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, समारा तिजोरीचे PHOTOS..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...