Home »Gossip» Story About Dina Pathak On Her Death Anniversary

Remembrance : नसीरुद्दीन शहांची सासू होती ही अॅक्ट्रेस, मुलींनीही वाजवला अॅक्टींगमध्ये डंका

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 16:55 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - हृषिकेष मुखर्जी यांच्या गोलमाल चित्रपटात अमोल पालेकर यांची आई असल्याचे नाटक करणाऱ्या अॅक्ट्रेसचा चेहरा सर्वांनाच लक्षात असेल. हिंदी चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेमध्ये दिसणाऱ्या प्रसिद्ध अॅक्ट्रेसेसपैकी एक असलेली ही अॅक्ट्रेस म्हणजे दिना पाठक. नाटक आणि त्यातही गुजराती नाटकांमध्ये मोठे नाव असलेल्या दिना पाठक यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
- दिना पाठक यांचे मूळ नाव दिना गांधी होते.
- 4 मार्च 1922 रोजी अमरेली गुजरातमध्ये दिना पाठक यांचा जन्म झाला होता.
- अगदी कमी वयात दिना पाठक यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत होता.
- त्यानंतर शिक्षणासाठी दिना पाठक मुंबईत आल्या. याठिकाणी विद्यार्थी चळवळीतही दिना पाठक यांनी सहभाग घेतला.
- स्वातंत्र्यपूर्व काळात गुजरातच्या भवाई थिएटरच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात लढा आणि स्वातंत्र्याबाबत जनजागृती पसरवण्याचे काम दिना पाठक यांनी केले.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, दिना पाठक यांच्याबाबत..

Next Article

Recommended