आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Om Shanti Om पूर्वी हिमेशबरोबर झळकली होती दीपिका, Video पाहून फराहने केली होती निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिपिका पादुकोन आज 31 व्या वर्षात पदार्पण करत आहे. फराह खानच्या ओम शांती ओम चित्रपटापासून सुरू झालेल्या प्रवासानंतर दीपिका पादुकोणच्या यशाची गाडी वेगाने धावू लागली. एका पाठोपाठ एक हिट चित्रपटांचा धडाका लावत अगदी कमी कालावधीत दिपिका बॉलीवूडच्या टॉप अॅक्ट्रेसेसच्या यादीत आली. पण ओम शांती ओमपूर्वीच दिपिकाने हिंदी ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये किंवा बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती असे म्हणायला हरकत नाही. हिमेश रेशमियाच्या गाजलेल्या नाम है तेरा या व्हिडीओ अल्बममधून दिपिका झळकली होती. 

हिमेश रेशमियाच्या गाजलेल्या व्हिडीओ अल्बम्सपैकी एक असलेल्या या अल्बममधून दीपिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आपण अभिनय करू शकतो हे तिला या व्हिडीओनंतर अधिक प्रकर्षाने जाणवले. तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर त्यामुळे यायला लागल्या होत्या. डायरेक्टर फराह खाननेदेखिल हिमेशचा हा व्हिडीओ अल्बम पाहिला. फराहला पहिल्या नजरेतच दिपिका आवडली आणि तिने लगेचच तिला आगामी चित्रपटासाठी साइन केले होते. 

हिमेशने दिल्या शुभेच्छा...
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिपिकाला पहिली संधी देणारा हिमेश म्हणाला, दिपिकाने ज्या प्रमाणे आघाडीची नायिका बनत यश मिळवले आहे ते यश ती डिझर्व्ह करते. ती देशाचा अभिमान आहे, वाढदिवसानिमित्त तिला अनेक शुभेच्छा. 
राकेश उपाध्याय
हिमेशचे बिझनेस पार्टनर राकेश उपाध्याय म्हणाले की, दिपिकाने जेव्हाही हिमेशच्या कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला तेव्हा तिने खूप मेहनत घेतली. 100 टक्के परिश्रम घेऊन तिने हे यश मिळवले आहे. 

Ex BF च्या शुभेच्छा 
दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्यानेही दीपिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळातही तिने मोठे यश संपादन करावे अशी इच्छा त्याने जाहीर केली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पहिल्या Video Album मध्ये कसा होता दीपिकाचा Look, अखेरच्या स्लाइडवर पाहा Video 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...