Home »Gossip» Story About Hate Story Actress Paoli Dam

'हेट स्टोरी' फेम पाओली अडकली लग्नाच्या बेडीत, न्यूड सीनने उडवून दिली होती खळबळ

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 12:06 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क- 'हेट स्टोरी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आणि बंगाली चित्रपट तसेच टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री पाओली दाम नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. वयाच्या 37 व्या वर्षी पाओली बॉयफ्रेंड अर्जुन देबसोबत बंगाली पद्धतीने विवाहबद्ध झाली. कोलकातामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला मोजके पाहुणे आमंत्रित होते.

बंगाली टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत पाओलीने भरपूर काम केले आहे. पण ती सर्वाधिक चर्चेत आली ते 2011 साली आलेल्या 'चत्रक' या बंगाली चित्रपटामुळे. या चित्रपटातील न्यूड सीन इंटरनेटवर लीक झाले होते. या सीनमुळे पाओली वादातही अडकली होती.


पाओलीविषयी जाणून घेऊयात, सर्वकाही...

केमिस्ट्रीत पोस्ट ग्रॅज्युएट..
- 4 ऑक्टोबर 1980 रोजी कोलकात्यात पाओलीचा जन्म झाला.
- कोलकात्यात जन्मलेल्या पाओलीच्या वडिलांचे मूळ बांगलादेशच्या फरीदपूरमधील आहे.
- तिने लॉरेटो स्कूल, बाओबाझालमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
- अभ्यासात हुशार असलेल्या पाओलीने स्कॉलरशिपही जिंकली होती.
- केमिस्ट टीचर किंवा पायलट बनण्याची पाओलीची इच्छा होती.
- तिने कोलकात्याच्या विद्यासागर कॉलेजमधून केमिस्ट्रीची डीग्री मिळवली. तर राजाबाजार सायन्स कॉलेजमधून पोस्टग्रॅज्युएट झाली.

बालपणीपासूनच डान्स, नाटकाची आवड
- पाओलीला लहानपणापासून नाटकांची आवड होती. तिने शास्त्रीय नृत्यही शिकले होते.
- नृत्य आणि नाटकांची आवड असली तरी तिला कधीही अॅक्ट्रेस बनण्याची इच्छा नव्हती.
- लहानपणी तिने गायनाचेही धडे गिरवले होते.

टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा
- बंगाली टीव्ही सिरियलमधून पाओलीचे अॅक्टींग करिअर सुरू झाले.
- 2003 मध्ये पाओली 'जिबोन निये खेला' या मालिकेत झळकली.
- त्यानंतर तिथिर अतिथी ही तिची मालिका खूप गाजली, टीव्हीवर ही मालिका आठ वर्षे सुरू होती.
- त्याशिवाय इतरही अनेक मालिकांत पाओली झळकली यातूनच ती सिनेसृष्टीच्या नजरेत आली.

'चत्रक' सिनेमामुळे आडकली वादात
- 2006 मध्ये पाओलीचा 'अग्निपरीक्षा' हा पहिला बंगाली चित्रपट रिलीज झाला.
- त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तिने आतापर्यंत 50 सिनेमांत काम केले आहे.
- 'चत्रक' या चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे पाओलीचे नाव वादात अडकले होते.
- अशा प्रकारची भूमिका केल्याने पाओलीवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.
- पण या वादातही पाओली ठाम राहिली. तिच्या कुटुंबातून तिच्यावर काहीही दबाव नाही, असे पाओली सांगते.

बॉलिवूडमध्येही बोल्ड एंट्री
- पाओलीने 'हेट स्टोरी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
- या चित्रपटातही पाओलीची बोल्ड भूमिका होती. यात तिने वेश्येची भूमिका केली होती.
- त्यानंतर पाओलीने अंकुर अरोरा मर्डर केस, गँग ऑफ घोस्ट आणि यारा सिली सिली अशा काही बॉलिवूड चित्रपटांतही काम केले.


पुढील स्लाइड्सवर पाहा, पाओलीचे काही फोटो जाणून घ्या तिच्याबाबत...

Next Article

Recommended