आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.मोहन आगाशेंनी केले होते \'जेम्स बाँड\'बरोबर काम, वाचा रॉजर मूरचे भारत कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - जेम्स बाँडचे पात्र जिवंत करणारे हॉलिवूड अभिनेते रॉजर मूर यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांनी सलग सात बाँडपटांमध्ये जेम्स बाँडची भूमिका साकारली होती. त्यापैकी ऑक्टोपसी या चित्रपटाचे बहुतांश शुटिंग हे भारतात झाले होते. पण रॉजर मूरचा भारताशी संबंध यापेक्षाही फार जुना आहे, अगदी त्याच्या आईपासून.
 
'ऑक्टोपसी' या चित्रपटाच्या आधीही एका चित्रपटाच्या निमित्ताने ते अनेक दिवस भारतात होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेते मोहन आगाशे यांनी काम केले होते. 
 
'कलकत्ता' येथे झाला होता आईचा जन्म
रॉजर मूरच्या इंडिया कनेक्शनची सुरुवात त्यांच्या आईपासून होते. रॉजरचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. तो लहानाचा मोठाही ब्रिटनमध्येच झाला. पण रॉजरची आई म्हणजे लिलियन पोप यांचा जन्म तत्कालीन कलकत्तामध्ये झाला होता. त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. रॉजरचा भारताशी हा सर्वात जवळचा आणि भावनिक संबंध आहे. 

रॉजर मूर यांचा चित्रपटाच्या निमित्ताने भारताशी असलेला संबंध, पुढील स्लाइड्सवर.. 
 
हेही वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...