Home »Gossip» Story About Poonam Dhillon On Her Birthday

B'day : पहिल्याच चित्रपटात या अॅक्ट्रेसने परिधान केला स्विमसूट, मराठी अभिनेता होता हिरो

दिव्य मराठी वेब टीम | Apr 18, 2017, 00:04 AM IST

  • पूनम यांचा त्रिशूल चित्रपटातील आणि सध्याचा लूक.
मुंबई - बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लन आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 18 एप्रिल 1962 रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनम 1977 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकून प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटात बिकिनी परिधान करत त्यांनी बोल्डनेस दाखवला होता. या चित्रपटात त्यांचे हिरो होते प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर.

एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना 'त्रिशुल' सिनेमाची ऑफर दिली होती, असे सांगितले जाते. सुरुवातीला पूनम यांची ऑफर नाकारली होती, मात्र नंतर त्यांनी तो सिनेमा स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे आयुष्यच पालटून गेले. 'त्रिशुल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

राजेश खन्नांसोबत जमली जोडी...
'त्रिशुल' या सुपरहिट सिनेमाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या पूनम यांची राजेश खन्नांसोबत ऑन स्क्रिन जोडी जमली होती. दोघांनी 'निशान' (1983), 'दर्द' (1991), 'आवाम' (1987), 'जय शिव शंकर' (1990), 'रेड रोज' (1980), 'जमाना' (1985) या सिनेमांमध्ये एकत्र काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली होती.
लग्नानंतर सिनेसृष्टीपासून दुरावल्या...
1988मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केले. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पूनम यांना पाहताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले होते. पूनमकडे आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर जोपर्यंत त्यांचा होकार आला नाही, तोपर्यंत दररोज ते त्यांना एक गुलाबाचे फूल पाठवत होते. अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनम यांनी सिनेमात काम करणे कमी केले होते. पूनम-अशोक यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून पलोमा हे मुलीचे तर अनमोल हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. दुर्दैवाने त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 1997 मध्ये अशोक आणि पूनम यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी पूनम यांना मिळाली. पूनम यांचा मुलगा अनमोल 24 वर्षांचा असून यूएसमध्ये उच्चशिक्षण घेत आहे, तर मुलगी पलोमा 21 वर्षांची आहे.
पूनम यांचा पहिलाच चित्रपट एका मोठ्या दिग्दर्शकांबरोबर होता. मिस इंडिया बनल्यानंतर त्यांना ही संधी मिळाली होती. त्याची कथाही रंजक आहे.. ती जाणून घेऊ पुढील स्लाइड्सद्वारे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended