आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : जेव्हा 'ड्रीमगर्ल' हेमाने फेटाळला 'ठाकूर' संजीव कुमार यांचा लग्नाचा प्रस्ताव..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - व्हर्सेटाइल अभिनेता संजीव कुमार यांचे कोणते रुप तुमच्यासमोर सध्या उभा आहे. संजीव कुमार यांनी सिनेमाच्या प्रत्येक रंगात स्वत:ला रंगवून घेतले होते. त्यांना विविध भूमिका करण्याचा खूप छंद होता. त्यांनी कधी नायकाची तर कधी खालनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंनज केले. 'आंधी'मध्ये त्यांनी तरुण्यात वृध्दाची साकारलेली भूमिका अद्याप कुणीही विसरू शकलेले नाही. 9 जुलै 1938मध्ये या अभिनेत्याचा जन्म एका माध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
 
संजीव कुमार यांचे खरे नाव हरिभाई जरीवाला. 'शोले' सिनेमाचे जेव्हा नाव येते तेव्हा गब्बरचा हा डायलॉग आपल्या कानात घूमायला लागतो, 'ठाकूर ये हाथ हमे दे दे...'. या सिनेमा वृध्द ठाकूरची भूमिका संजीव यांनी साकारली होती. रिअल लाइफमध्ये संजीव हे गंभीर असले तरी ते त्यांच्या अफेअरच्या बाबतीत खूप संशयी व्यक्ती होते. संजीव अफेअर सुरू होण्यापूर्वीच त्या महिलेवर किंवा तरुणीवर संशय घेत असे. त्यांना लाइमलाइटमध्ये राहणे बिल्कूल आवडत नव्हते. असे सांगण्यात येते, की त्यांना हेमा मालिनी खूप आवडाच्या, मात्र हेमा यांनी संजीव यांना नकार दिला होता.
 
संजीव कुमार यांच्या अभिनयात एक वैशिष्ट होते. 'कोशिश'मध्ये त्यांना साकारलेली एका मुक्या व्यक्तीची भूमिका असोत किंवा 'शोले'मधील ठाकूरची भूमिका अथवा 'सीता और गीता' आणि 'अनामिका'सारख्या रंगबेरंगी शर्ट घालून तरुणींवर लाइन मारणारे संजीव कुमार, प्रत्येक भूमिका मनापासून साकारत होते. 'नया दिन नई रात'मध्ये एक नव्हे नऊ भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते. त्यांनी प्रत्येक व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर दाखवली आहे.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हेमा मालिनी यांनी कसा दिला संजीव यांना धोका...
बातम्या आणखी आहेत...