Home »Gossip» Story About Singer Adnan Sami Life

पाक सोडून भारतात आलेला अदनान राहतो या घरात; लंडनमध्ये जन्म, मूळ अफगाणिस्तानात

ओंकार कुलकर्णी | Apr 17, 2017, 15:08 PM IST

मुंबई -अदनान सामी मुंबईतील एका इमारतीत 13 व्या मजल्यावर राहतो. काही दिवसांपूर्वीच त्याने आमच्या प्रतिनिधीली घरी आमंत्रित करून त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. यादरम्यान, अदनानाने सांगितले की, जेव्हा त्याचे वजन 230 किलो झाले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की, तो केवळ 6 महिनेच जगू शकेल. अदनानच्या मते, त्यावेळी त्याच्यासमोर करा किंवा मरा अशी स्थिती निर्माण झाली होती.

असे कमी केले वजन..
- अदनानने सांगितले की, अनेक लोकांना वाटते की, मी वजन कमी करण्यासाठी सर्जरी केली आहे. पण ते सत्य नाही. मी डाएट आणि व्यायाम याद्वारे वजन कमी केले आहे.
- माझे वजन 230 किलो होते. जणू मी अगदी मरणाच्या जवळ पोहोचलो होतो. बेडवर नीट लोटताही येत नव्हते. माझ्या छातीवर मोठ्या प्रमाणात फॅट जमा झाले होते. सरळ लोटलो तर माझ्या छातीवर दबाव येऊन माझा श्वास रोखला जाऊ लागायचा.
- मी अनेक वर्षे सोफ्यावर बसून आणि झोपून घालवली. त्यामुळे इतर समस्या सुरू झाल्या.
- फुडी असल्याने मी खूप जास्त खायचो. ईटिंग हॅबिटवर माझे नियंत्रण नव्हते. मला आठवते, बिर्याणीची संपूर्ण हंडी मी एकटा संपवायचो.
- मी स्वतःला नशीबवान समजतो की, मी 167 किलो वजन कमी करू शकलो. आता माझे डाएटवर नियंत्रण आहे. मी एकेकाळी ब्राऊनीचे संपूर्ण पाकिट संपवायचो. पण आता एखादाच घास खातो. वर्कआउटचे सांगायचे तर मला जिममध्ये जायला किंवा दुसरा व्यायाम करायला आवडत नाही. त्यामुळे फिट राहण्यासाठी मी स्क्वॅश खेळतो.

पाकिस्तानात ना जन्म, ना पालनपोषण
- अदनानने सांगितले, त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि त्याच ठिकाणी त्याचे शिक्षणही झाले. माझे वडील डिप्लोमॅट होते. अनेक देशांत त्यांची पोस्टींग जाली.
- मी कधीही पाकिस्तानात लहानाचा मोठा झालो नाही. काही वर्षे त्याठिकाणच्या काही भागांत राहिलो. माझ्या लहानपणीच्या आठवणी पोर्तुगाल, इंग्लंड आणि जगातील इतर शहरांतील आहेत.
- मी 21 वर्षांचा होतो तेव्हा मी पाकिस्तानात राहिलो. पण ते केवळ सुट्या वाढल्यांमुळे. त्यामुळेच माझ्या पाकिस्तानशी संबंधित काही आठवणी नाहीत.
- पाकिस्तानच्या आठवणी नसल्याचे सांगतानाच अदनान अफगाणिस्तानशी संबंध असल्याचे सांगतो.

मूळचा पाकिस्तानी नव्हे अफगाणी आहे अदनान.. पुढील स्लाइडवर...
सर्व फोटो : अजित रेडेकर.

Next Article

Recommended