आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : ओशोंच्या आश्रमात \'सेक्सी संन्यासी\' म्हणून प्रसिद्ध होते विनोद खन्ना, वाचा किस्से

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना आज आपल्यात असते तर त्यांनी आज (6 ऑक्टोबर) 71 वा वाढदिवस साजरा केला असता. पण कॅन्सरने आजारी असलेल्या विनोद खन्ना यांचे याचवर्षी 27 एप्रिल रोजी निधन झाले. 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हती.
 
मध्यमवर्गीय कुटुंबातील विनोद बॉलिवूड अभिनेता होण्यापासून ओशो यांच्याशी प्रभावित होऊन वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्यापर्यंत ते चर्चेत राहिले होते. विनोद खन्ना यांनी ओशोंच्या चरणी जवळपास 5 वर्षे माळी म्हणून काम कले होते. यादरम्यान त्यांना 'सेक्सी संन्यासी'सुध्दा म्हटले गेले होते.

ओशोंमुळे प्रभावित झाले होते विनोद
एकेकाळी विनोद खन्ना कुटुंबाला वेळ देण्यासाठी रविवारी काम करत नव्हते. असे करणारे ते शशी कपूर यांच्यानंतरचे दुसरे अभिनेते होते. परंतु ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले. विनोद खन्ना पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जायचे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले अनेक शूटिंग शेड्यूलसुध्दा पुण्यातच ठेवले. डिसेंबर 1957मध्ये विनोद यांनी सिनेमांपासून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना 'सेक्सी संन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. विनोद अमेरिकेला निघून गेले आणि ओशोंसोबत 5 वर्षे घालवले. तिथे त्यांनी माळीचे काम केले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, विनोद खन्नांविषयी काही इतर Facts आणि किस्से...
 
बातम्या आणखी आहेत...