आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका हिट चित्रपटाने हवेत गेला होता हा अॅक्टर, असे उध्वस्त झाले करिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्टर आणि नंतर बिझनेसमॅन बनलेल्या कुमार गौरवचा आज 57 वा वाढदिवस (11 जुलै) आहे. कुमार गौरवचे नाव बॉलिवूडच्या सुपरफ्लॉप अॅक्टर्समध्ये घेतले जाते. 1981 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट 'लव्ह स्टोरी'मधून त्यांनी डेब्यू केला होता. पण पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्याने डोक्यात हवा गेली आणि त्यांनी त्या काळातील नव्या अॅक्ट्रेसेसबरोबर काम करायला नकार दिला. मात्र कुमार गौरव यांनी ज्यांना नकार दिला त्या अॅक्ट्रेसेस सुपरहिट झाल्या असे सांगितले जाते. 

मंदाकिणीबरोबर चित्रपट करण्यास दिला नकार.. 
'लव्ह स्टोरी'मुळे कुमार गौरव एका रात्रीत स्टार बनले. पण स्टारडम त्यांना सांभाळता आले नाही. कोणत्याही नव्या अॅक्ट्रेसबरोबर काम न करण्याचा निर्णय त्यांनी लगेच घेतला. त्याचदरम्यान दिनेश बन्सल यांनी त्यांच्या शिरीन फरहाद चित्रपटासाठी यास्मीन नावाच्या नव्या मुलीला साईन केले आणि नंतर कुमार गौरवकडे गेले. कुमार गौरव यांनी चित्रपट करण्यास नकार दिला. यास्मीन आणि दिनेश बन्सल यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकले नाही आणि चित्रपट बंद झाला. यास्मीन परत गेली. चार वर्षे गेली. नंतर यास्मीनला समजले की, राज कपूर एक चित्रपट तयार करत आहेत आणि त्यासाठी त्यांना एक नॉर्थ इंडियन लूक असलेली तरुणी हवी आहे. यास्मीनने 'राम तेरी गंगा मैली'साठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. चित्रपट रिलीज झाला तेव्हा यास्मीन मंदाकिणी बनली होती.चित्रपट हिट झाला आणि मंदाकिणी स्टार बनली. गौरव कुमार मात्र त्यावेळी इंडस्ट्रीतून बेपत्ता झाला होता. 

आता कोणतीही प्रसिद्ध हिरोईन कुमार गौरवबरोबर काम करायला तयार नव्हीत त्यावेळी कुमार गौरव यांनी एका चित्रपटासाठी प्रोड्युसरला मंदाकिणीचे नाव सुचवले. पण मंदाकिणीला कुमार गौरव हिरो आहे हे कळल्यावर तिने नकार दिला. कुमार गौरवने त्या काळात पूनम ढिल्लन, रती अग्निहोत्री, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, माधुरी दीक्षित अशा हीट हिरोईनबरोबर काम केले तरीही त्याला यश मिळवता आले नाही. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कुमार गौरव यांच्याशी संबंधित काही इतर गोष्टी... 
 
बातम्या आणखी आहेत...