आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी या अभिनेत्याच्या घरात नव्हती सायकल, आज एका चित्रपटासाठी घेतो ५० लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव निरहुआचे दोन चित्रपट 'निरहुआ चलल ससुराल' आणि 'निरहुआ चलल अमेरिका' हे दोन्ही चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. दिनेशने चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर खूप स्ट्रगल केला आहे. त्याच्या घरी इतकी गरिबी होती की त्याच्याकडे एक सायकलही नव्हती. आता भोजपुरी स्टार बनल्यानंतर दिनेश एका चित्रपटा साठी 40 ते 50 लाख रुपये घेतो. केवळ 3500 रुपयांत चालायचे सात जणांचे कुटुंब..

- एक वेळ अशी होती की जेव्हा निगहुआ ची महिन्याची कमाई केवळ 3500 रुपये होती. या कमाईत तो ७ जणांचे कुटुंब चालवत असे. 
- दिनेश लाल गाजीपूर येथील टंडवा गावात राहतो. तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. 
- पैसे कमविण्यासाठी त्याचे वडील दोन मुलांना घेऊन कोलकाताला गेले. यावेळी त्यांनी पत्नी आणि तीन मुलींना गावीच राहु दिले. 
- कोलकातामधील एका झोपडपट्टीमध्ये दोन मुलांना घेऊन त्याचे वडील राहिले. तिथे ते मोलमजुरी करुन 3000 रुपये कमवत असत. येथूनच दिनेशने त्याचे शिक्षण पूर्ण केले. 
 
वडिलांची इच्छा होती की दिनेशने नोकरी करावी..
- १९९७ साली दिनेश त्याचा भाऊ आणि वडिलांसोबत गावी परत आला. दिनेशने गाजीपूर मलिकपूरा कॉलेजमधून बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. 
- दिनेशच्या वडिलांना त्याने नोकरी करावी आणि घराला हातभार लावावा असे वाटत होते.
-दिनेश त्याचा चुलतभाऊ बिरहा गायक विजय लाल यावर फार प्रभावित होता म्हणून त्यानेही गायनास सुरुवात केली. 
 
2003 साली एका अल्बममुळे मिळाली ओळख...
दिनेशचा लहान भाऊ प्रवेश लाल ने एका मुलाखतीत सांगितले की, दिनेशने खूप स्ट्रगल केला आहे. घरामध्ये सायकलही नसल्याने कुठे बाहेर जाण्यासाठी पायीच निघावे लागत असे. 2003 साली दिनेश लाल चा अल्बम 'निरहुआ सटल रहे' रिलीज झाला. यामुळे दिनेशला ओळख मिळाली. 2001 साली दिनेशने 'बुढवा में दम बा' आणि 'मलाई खाए बुढवा' हे दोन अल्बम रिलीज केले. यानंतर तो हळुहळू भोजपुरी चित्रपटांचा हिरो झाला. आता दिनेशचा भाऊ प्रवेश भोजपुरी चित्रपटात काम करतो.

असा सुरु केला अभिनयाचा प्रवास...
2005 साली दिनेश मुंबईत आला. एका दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार त्याने 'चलत मुसाफिर..' मध्ये दोन गाणे गायले आणि अभिनयही केला. या चित्रपटात दिनेशने छैला बिहारी च्या मित्राची भूमिका केली आणि हा चित्रपट हिट ठरला. यानंतर दिनेशला सहकलाकाराच्या अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या. पण त्याच्या मनात हिरो बनण्याची इच्छा होती...
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, निरहुआ च्या पर्सनल लाईफचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...