आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगाल बनला होता बिग बींचा हा मित्र, जेवणासाठीही खिशामध्ये उरले नव्हते पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन यांचे करिअर ज्याप्रकारे चढ उतारांनी भरलेले राहिले आहे, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक संघर्ष चित्रपटांत त्यांच्या मित्राची भूमिका करणाऱ्या राम सेठींना करावा लागला. अनेक लोक त्यांना प्यारेलाल नावानेही ओळखायचे. 'मुकद्दर का सिकंदर' (1978) मध्ये बिग बींचा मित्र प्यारेलाल आवाराची भूमिका केल्यानंतर त्यांना हे नाव मिळाले होते. पण एक काळ असा आला की, त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे ते अक्षरशः रस्त्यावर आले होते.  या गोष्टीचा खुलासा त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये केला होता. 

काय म्हणाले होते राम सेठी.. 
- 2012 मध्ये एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सेठी म्हणाले होते, 1993 नंतर माझी अवस्था वाईट झाली होती. 53 व्या वर्षी मला कुटुंबाची मदत करायची होती पण काम मिळत नव्हते. त्यावेळी मी अगदी जेवायलाही पैसे नसल्याचा काळ अनुभवला. मी रस्त्यावर आलो होतो. प्रकाशजी (प्रकाश मेहरा) मला त्यावेळी खूप मदत केली. 
- अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी तो काळ पुढे लोटला. नंतर वर्षभराने 1994 मध्ये काही टीव्ही डायरेक्टर्सनी त्यांना संपर्क केला आणि अॅक्टींगची संधी दिली. त्यावेळी त्यांना दिवसाचे 2000 रुपये मिळायचे. त्यांनी सुमारे चार वर्षे टिव्हीवर काम केले. 
 
लाच दिली नाही म्हणून शो टेलिकास्ट झाले नाही 
- राम सेठी म्हणाले, 1996 मध्ये मला स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करायचे होते. काही मित्रांनी माझी मदत केली. त्यांच्याकडे फायनान्सर आणि डायरेक्टरही होता. आम्ही काही टीव्ही सिरीज तयार केल्या. दूरदर्शनवर त्या टेलिकास्ट होणार होत्या. पण फायनान्सर अमेरिकन होता. त्याने दूरदर्शनला लाच द्यायला नकार दिला आणि आमची सिरियल टेलिकास्ट होऊ शकली नाही. 
- 2000 मध्ये मला कौटुंबीक अडचणींमुळे दिल्लीला जावे लागले. मी दोन वर्षांनी परतलो तेव्हा इंडस्ट्री पूर्णपणे बदलली होती. अनेक नवीन चॅनल्स सुरू झाले होते. मी कम्फर्टेबल नव्हतो. नैराश्यात गेलो. मित्रांना भेटायचो तर त्यांची नावे विसरायचो. प्रकाशजींना भेटलो तेव्हा त्यांनी मदत केली. माझ्याकडे काही जमीन होती, तीही विकली. 
- 2003 मध्ये प्रकाश मेहरा यांनी अमिताभ आणि त्यांच्याबरोबर एक चित्रपट प्लान केला होता. स्क्रिप्ट फायनल झाली होती. पण मेहरांना हार्ट अटॅक आल्याने तो चित्रपट पुढे सरकलाच नाही. 
- राम यांच्या मते त्यांनी 2012 मध्ये एका ऑटोमोबाइल कंपनीच्या स्कूटर अॅडमध्ये काम केले. त्यानंतर लोकांनी त्यांना नोटिस केले आणि आता त्यांना चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, राम सेठी यांच्या जीवनाशी संबंधित काही बाबी... 

 
बातम्या आणखी आहेत...