आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 कोटी आहे या फेमस अॅक्टरची फीस, हैदराबादामध्ये बनवला 100 कोटींचा लॅव्हिश आशियाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादः अलू अर्जुन दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलू एका सिनेमासाठी 13 ते 15 कोटी इतके मानधन घेतो. शिवाय तो त्या लॅव्हिश लाइफस्टाइलसाठीसुद्धा ओळखला जातो. अलूचे हैदाराबादमध्ये आलिशान घर असून त्याची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे.
 
कसे आहे अलूचे घर...
अलूच्या या घराचे इंटेरिअर डिझायनर आमिर आणि हमीदा यांनी तयार केले आहे. घराचे इंटेरिअल अलू आणि त्याच्या पत्नीच्या आवडीनुसार तयार करण्यात आले आहे. घराला बॉक्स शेप देण्यात यावा, मात्र फार बटबटीत इंटेरिअर नसावे, अशी अलू आणि त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यानुसार हे घर बाहेरुन बॉक्सच्या आकाराचे दिसते. घराचे इंटेरिअर अतिशय सुंदर आहे. घराच्या आता शानदार कॉरिडोर आहे. तेथून लिव्हिंग स्पेसकडे जाण्याचा मार्ग आहे. शिवाय लिव्हिंग रुम, डायनिंग, किचन आणि बार काउंटर अशा अनेक सुविधा घरात आहेत. 

फोर्ब्सच्या टॉप 100 सेलिब्रिटीमध्ये मिळाले आहे स्थान...
फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटीमध्ये अलूला स्थान मिळाले आहे. 2015 मध्ये टॉप 50 मध्येही तो होता. सुपरस्टार चिरंजीवीचा अलू नातेवाईक आहे. चिरंजीवींची बहीण निर्मला अलूची आई आहे. या नात्याने चिरंजीवी अलूचे मामा आहेत. निर्माते अलू अरविंद हे अलूच्या वडिलांचे नाव आहे. 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत अलू अर्जुनचे लग्न झाले. 2014 मध्ये या दाम्पत्याला मुलगा झाला. 2016 साली अलू अर्जुनने 800 जुबली या नावाने नाइट क्लब सुरु करुन व्यवसायात पदार्पण केले. 

वयाच्या दुस-या वर्षीपासून करतोय अभिनय...
वयाच्या अवघ्या दुस-या वर्षी अलू अर्जुनने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.  'विजेता' (1985) या सिनेमात पहिल्यांदा तो बालकलाकाराच्या रुपात झळकला होता. 2003 मध्ये 'गंगोत्री' या तेलगू सिनेमात तो पहिल्यांदा लीड हीरोच्या रुपात झळकला. हा सिनेमा गाजला आणि अलूने कधीच मागे वळून पाहिले नाही. आत्तापर्यंत त्याने 15 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 'आर्य', 'हॅप्पी', 'परुगु', 'आर्य 2', 'बद्रीनाथ' आमि 'रेस गुर्रम' या सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अलूच्या हैदराबादस्थित आलिशान घराचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...