आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Latest Pix: काजोलची ऑनस्क्रीन बहीण आहे रिअल लाइफमध्ये सोनाक्षी सिन्हाची मावस बहीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शाहरुख खान आणि काजोल यांच्या क्यूट आणि रोमँटिक केमिस्ट्रीचा तडका असलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा ब्लॉकबस्टर सिनेमा आजही प्रेक्षकांच्या आवडत्या फिल्म्सपैकी एक आहे. या सिनेमात शाहरुखची मेहुणी आणि काजोलच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री पूजा रुपारेल हिने साकारली होती. सिनेमात मिस राजेश्वरी उर्फ छुटकीची भूमिका साकारुन पूजा लाइमलाइटमध्ये आली होती. 1995 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकलेली पूजा आता ग्लॅमरस दिसते. सिनेमातील पूजाच्या निरागस अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली होती.

जॅकी श्रॉफच्या किंग अंकलमधून केले होते डेब्यू..
जॅकी श्रॉफच्या किंग अंकल या सिनेमातून पूजाने डेब्यू केले होते. DDLJ या सिनेमाला 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूजा सिनेमाच्या स्टारकास्टसह कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या शोमध्ये पोहोचली होती. त्यावेळी ब्लू गाऊनमध्ये पूजा अतिशय सुंदर दिसली.
याशिवाय गेल्या वर्षी अनिल कपूरच्या 24 या मालिकेत झळकली होती. सध्या पूजा आपल्या स्टँड अप कॉमेडी शो आणि स्क्रिप्ट रायटिंगमध्ये बिझी आहे. पूजाने मुंबईतील एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटीतून एम. ए. इन इंडस्ट्रीयल सायकॉलोजीत पदवी प्राप्त केली आहे.

पूजाचे कुटुंबः
पूजा रुपारेलची आई सुनीता आणि सोनाक्षी सिन्हाची आई पूनम या दोघी सख्या मावस बहिणी आहेत. म्हणजेच पूजा आणि सोनाक्षीदेखील कझिन आहेत. पूजाची थोरली बहीण भावना रुपारेल हीदेखील अभिनेत्री असून 'चल पिक्चर बनाते है' या सिनेमात ती झळकली होती. सध्या ती तेलगू सिनेमात कार्यरत आहे.

पूजाच्या लूकमध्ये झालेला बदल या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा 20 वर्षांनी कशी दिसतेय प्रेक्षकांची लाडकी 'छुटकी'...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...