आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Looks Like 'Style' And 'Xcuse Me' Actor Sahil Khan Is NOT Missing Bollywood At All

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॅकी श्रॉफच्या पत्नीसोबत जुळले होते या अॅक्टरचे नाव, बॉलिवूड सोडून जगतोय असे लग्झरी लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2001 मध्ये आलेल्या 'स्टाइल' या सिनेमात शर्मन जोशीने बंटू आणि साहिल खानने चंटू या भूमिका वठवून प्रेक्षकांना लोटपोट केले होते. दोघांच्या परफेक्ट कॉमिक टायमिंगसोबत पायाने हँडशेक करण्याची स्टाइल खूप गाजली होती. स्टाइलचा सिक्वेल 'एक्सक्यूज मी' या सिनेमातही ही जोडी झळकली होती. या सिनेमानंतर शर्मनने अनेक सिनेमे केले. मात्र निवडक सिनेमे करुन साहिल खान मोठ्या पडद्यावरुन जणू गायबच झाला.

जॅकी श्रॉफच्या पत्नीसोबत जुळले होते नाव...
शॉर्ट टाइम अॅक्टर राहिलेल्या साहिल खानच्या नावाला वादाची किनार आहे. अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशासोबत साहिलचे अफेअर होते, असे म्हटले जाते. मात्र साहिलने ही गोष्ट नाकारली होती, तर आयशाने त्याला गे म्हटले होते. आयशाने म्हटले होते, की साहिल गे असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. आयशाने गे असल्याचा आरोप केल्यानंतर साहिलने आयशासोबतचे त्याचे इंटीमेट फोटोज कोर्टात सादर केले होते.

निगार खानसोबत झाले होते लग्न
साहिल खानचे लग्न 2004 मध्ये ईराणी वंशाची अभिनेत्री निगार खानसोबत झाले होते. मात्र वर्षभरातच म्हणजे 2005 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. निगारने 'रुद्राक्ष' (2004), 'शादी का लड्डू' (2004), 'ताज महल: एक इटरनल लव स्टोरी' (2005) आणि 'शॉर्टकट' (2009) या निवडक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.

गोव्यात अनेक जिमचा मालक आहे साहिल
बॉलिवूड सोडल्यानंतर साहिलने बॉडी बिल्डिंगमध्ये आपले प्रोफेशन बनवले. आज तो गोव्यात 'Muscle & Beach' नावाच्या जिमचा मालक आहे. गोव्यात या नावाने त्याच्या अनेक जिम आहेत. हेल्दी बॉडी आणि फिटनेससाठी तो 14 आठवड्यांचे ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम घेतो. इतकेच नाही तर तो मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा तो ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

परदेशी तरुणीला डेट करतोय साहिल
साहिलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एक नजर टाकली असता, त्याचे एका परदेशी तरुणीसोबत अफेअर असल्याचे दिसून येते. या तरुणीचे नाव मात्र त्याने उघड केलेले नाही. त्याच्या इंस्टाग्रामवर @love_rose92 नावाने हे फोटोज बघायला मिळतात. साहिलने तिच्यासोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ही तरुणी पूलमध्ये अंघोळ करताना तर कधी बिकिनीत पोज देताना दिसतेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, साहिल खानचे लेटेस्ट फोटोज..

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...