आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day Spcl: काँग्रेस आमदाराची मुलगी आहे नेहा शर्मा, फॅशन डिझाइनिंगचे घेतले आहे शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आज 28 वर्षांची झाली. 21 नोव्हेंबर 1987 रोजी जन्मलेल्या नेहाने यंगिस्तान (2014), क्या कूल है हम (2012), क्रूक (2010) या सिनेमांमध्ये काम करुन प्रसिद्धी मिळवली आहे.
बिहारच्या भागलपूर शहरात झाला जन्म
भागपूर शहरात जन्मलेली नेहा नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. 28 वर्षांच्या नेहाने दिल्लीच्या एनआयएफटी कॉलेजमधून फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण घेतले. नेहाचे वडील काँग्रेसचे आमदार आहेत.
भागलपूरच्या शाळेतून घेतले शिक्षण
नेहाने शालेय शिक्षण भागलपूराच्या माऊंट कारमेल शाळेतून पूर्ण केले. नवी दिल्लीच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नीलॉजी कॉलेजमधून फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतले. काही दिवस फॅशन डिझाइनर म्हणून काम केल्यानंतर नेहाने तेलगु सिनेमामधून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.
तेलगु सिनेमातून केले पदार्पण
नेहाने 'चिरुथ' या तेलगु सिनेमातून पदार्पण केले. 2007मध्ये आलेल्या या सिनेमाचे अश्विनी दत्तने दिग्दर्शन केले होते. नेहासोबत चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजानेसुध्दा या सिनेमातून पदार्पण केले होते. परंतु सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. नेहाचा 'चिरुथ' हा तेलगु सिनेमा अपयशी राहिला मात्र त्याची भरपूर चर्चा झाली. त्याकारणाने महेश भट यांनी तिला 'क्रूक'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली चर्चा केली होती. लवकरच ती 'हेराफेरी'च्या तिस-या भागात दिसणार आहे.
वडिलांसाठी केला होता प्रचार
बिहारमधून विधानसभा निवडणूक लढत असलेले वडील अजीत शर्मा यांच्यासाठी नेहाने भोगलपूरा येथे प्रचार केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून नेहा शर्माची काही ग्लॅमरस छायाचित्रे...