आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम मुलाशी लग्न केल्याने वडिलांनी तोडले होते नाते, नंतर घटस्फोट, अशी आहे सुनिधी चौहानची LIfe story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गायनात नाव कमावलेली गायिका सुनिधी चौहान ही तशी अनेकांची आवडती गायिका. आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी ही गायिका आज 33 वर्षांची झाली आहे. अगदी लहानवयातच सुनिधीने गायनाला सुरुवात केली होती. मुळची दिल्ली येथील असणाऱ्या सुनिधीचे प्रोफेशनल तसेच पर्सनल आयुष्यही वादाच्या भोवऱ्यात आले होते. सुनिधीने केले आहेत दोन लग्न..
 
सुनिधीविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे. सुनिधीने दोन लग्ने केले आहेत. तिचे पहिले लग्न वयाच्या 18व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खानसोबत झाले होते.
 
वर्षभरसुद्धा टिकले नाही हे लग्न...
सुनिधीने एका मुलाखतीत सांगितले होते, की ती बॉबीसोबत खूप आनंदी होती. सासरची मंडळीसुध्दा तिला सून नाही तर मुलगी असल्यासारखे वागवत होते. बॉबीसुध्दा तिच्यावर खूप प्रेम करत होता. सुनिधीने हे लग्न कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केले होते. मात्र 2002मध्ये झालेले हे लग्न 2003मध्ये संपुष्टात आले. या लग्नाच्या जवळपास 9 वर्षांनी 2012मध्ये सुनिधीने दुसरे लग्न संगीत दिग्दर्शक हितेश सैनिकसोबत केले.
 
वयाच्या 13व्या वर्षीपासून करतेय गायन...
सुनिधीने गायनाची सुरुवात वयाच्या 13व्या वर्षीपासून केली आहे. 1996मध्ये आलेल्या 'शस्त्र'
सिनेमात तिने 'लडकी दीवानी देखो' हे पहिले गाणे गायले होते. 20 वर्षांच्या करिअरमध्ये सुनिधीने अनेक बॉलिवूड गाण्यांना आवाज दिला आहे. त्यात धडक-धडक (बंटी और बबली), भागे रे मन (चमेली), महबूब मेरे (फिजा), धूम मचाले (धूम), बीड़ी जलइले (ओमकारा) और चोर बाजारी (लव आज कल), शीला की जवानीसारखे गाणे सुपर-डुपर हिट झाले. सुनिधी केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपूरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळ भाषेतही गाणे गाते.
 
सोशल मीडियावर आहे अॅक्टिव्ह...
सुनिधी चौहान सोशल मीडियावरसुध्दा खूप अॅक्टिव्ह आहे. ती इंस्टाग्राम, टि्वटर आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून चाहत्यांसोबत विचार आणि फोटो शेअर करते.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुनिधीचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...