आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 29 व्या वर्षीपर्यंत सुनिधीची झाली दोन लग्ने, वर्षभरातच झाला होता पहिला घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : गायिका सुनिधी चौहान सोशल मीडियावर अॅक्टिव असून आपल्या आयुष्याशी निगडीत गोष्टी आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. अलीकडेच सुनिधीने एक फोटो शेअर केला असून यामध्ये ती फिटनेससाठी जिममध्ये घाम गाळताना दिसतेय. तर एका फोटोतून तिने येत्या ३० सप्टेंबर रोजी सिंगापूर येथे तिचा लाइव्ह शो असल्याचे तिने सांगितले. प्रोफेशनल लाइफव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास, वयाच्या २९ व्या वर्षीपर्यंत सुनिधीची दोन लग्ने झाली आहेत.
वयाच्या १८ व्या वर्षी झाले होते सुनिधीचे पहिले लग्न...
सुनिधीविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे. सुनिधीने दोन लग्ने केले आहेत. तिचे पहिले लग्न वयाच्या 18व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खानसोबत झाले होते. सुनिधीने एका मुलाखतीत सांगितले होते, की ती बॉबीसोबत खूप आनंदी होती. सासरची मंडळीसुध्दा तिला सून नाही तर मुलगी असल्यासारखे वागवत होते. बॉबीसुध्दा तिच्यावर खूप प्रेम करत होता. सुनिधीने हे लग्न कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केले होते. मात्र 2002मध्ये झालेले हे लग्न 2003मध्ये संपुष्टात आले. या लग्नाच्या जवळपास 9 वर्षांनी 2012मध्ये सुनिधीने दुसरे लग्न संगीत दिग्दर्शक हितेश सैनिकसोबत केले.

वयाच्या 13व्या वर्षीपासून करतेय गायन...
सुनिधीने गायनाची सुरुवात वयाच्या 13व्या वर्षीपासून केली आहे. 1996मध्ये आलेल्या 'शस्त्र'
सिनेमात तिने 'लडकी दीवानी देखो' हे पहिले गाणे गायले होते. 20 वर्षांच्या करिअरमध्ये सुनिधीने अनेक बॉलिवूड गाण्यांना आवाज दिला आहे. त्यात धडक-धडक (बंटी और बबली), भागे रे मन (चमेली), महबूब मेरे (फिजा), धूम मचाले (धूम), बीड़ी जलइले (ओमकारा) और चोर बाजारी (लव आज कल), शीला की जवानीसारखे गाणे सुपर-डुपर हिट झाले. सुनिधी केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपूरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळ भाषेतही गाणे गाते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुनिधीचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...