आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: खंडाळ्यात आहे सुनील शेट्टीचे स्वप्नातील घर, निवांत क्षण येथेच घालवतो बॉलिवूडचा 'अन्ना'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये 'अन्ना' नावाने प्रसिद्ध असेलला अभिनेता सुनील शेट्टीने मुंबईजवळील खंडाळा येथे आपले स्वप्नातील घर साकारले आहे. पत्नी मानासोबत मिळून त्याने आपला हा आशियाना सजवला आहे. त्यांच्या या हॉलीडे होममध्ये सर्व चैनीच्या वस्तू उपलब्ध आहेत.
सुनील शेट्टीचे हे दुसरे घर आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह सुटी एन्जॉय करायला खंडाळ्यातील या हॉलीडे होममध्ये येत असतो. चोहोबाजुंनी पसरलेली हिरवीगार पालवी, बौद्ध प्रतिमा आणि त्याचे लाडके पप्पीज त्याच्या हॉलीडे होमची शोभा वाढवतात. सुनील आपल्या या घरी अनेकदा शानदार पार्टींचेही आयोजन करत असतो. घराच्या लॉन परिसरात एक सुंदर स्विमिंग पूलसुद्धा तयार करण्यात आला आहे.
वयाची 54 वर्षे केली पूर्ण
सुनील शेट्टीच्या घराचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे एकेकाळी बॉलिवूडमधील सुपरस्टार पदावर विराजमान असलेला हा अभिनेता आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमधील मुल्कि येथे झाला. 1992पासून तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 1992 मध्ये 'बलवान' या सिनेमाद्वारे त्याने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. या सिनेमानंतर सुनीलने कधीही मागे वळून पाहिले नाही.
'वक्त हमारा है'(1993), 'दिलवाले' (1994), 'मोहरा' (1994), 'सपूत' (1996), 'हेरा फेरी' (1999), 'धड़कन' (2000), 'फिर हेरा फेरी' (2006) आणि 'मिशन इस्तांबुल' (2008) यांसारख्या हिट सिनेमांमध्ये झळकलेला सुनील अलीकडेच 'जय हो' आणि 'कोयलांचल'मध्ये दिसला होता. तसे पाहता सुनील आता अभिनयापेक्षा आपले जास्त लक्ष हॉटेल बिझनेसवर केंद्रीत करतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सुनील शेट्टी आणि त्याच्या पत्नीच्या स्वप्नातील आशियाना कसा आहे...