आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny And Bobby Deol\'s Bonding With Step Mother Hema Malini

सनी-बॉबीने हेमा यांना कधीही स्वीकारले नाही आई म्हणून, असे आहे सावत्र आईसोबतचे स्टार्सचे नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहणा-या सेलिब्रिटींमध्ये 67 वर्षीय हेमामालिनी यांच्या नावाचा समावेश आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हेमामालिनी यांच्याशी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा धर्मेंद्र विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे.
हेमामालिनी यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, तर मुलगा सनी देओल सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता. दोघांचेही कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. विशेषतः सनी देओल आपल्या वडिलांच्या निर्णयामुळे नाखुश होता. प्रेम आणि कुटुंब यांच्यात समतोल साधत धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन हेमामालिनी यांच्यासोबत लग्न केले.
धर्मेंद्र यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांचे सावत्र आई हेमामालिनीसह खूप चांगले संबंध नाहीत. शिवाय सावत्र बहिणी ईशा आणि अहाना यांच्यासोबतही त्यांनी नाते ठेवलेले नाही. सनी आणि बॉबी आपल्या दोन्ही सावत्र बहिणींच्या लग्नात सहभागी झाले नव्हते. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हे दोघे सावत्र आई आणि बहिणींविषयी बोलणे टाळत असतात.
सनी आणि बॉबीच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये आणखी काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा स्वीकार केलेला नाही. तर काहींनी सहज आपल्या सावत्र आईला स्वीकारले.
एक नजर टाकुया अशाच काही नातेसंबंधांवर...