आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक इव्हेंटमध्ये पती डॅनिअल का असतो सावलीप्रमाणे सोबत, सनीने सांगितले धक्कादायक कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी इंडस्ट्रीत आज स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. सनीने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानपासून ते अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. इतकेच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतही तिचे पदार्पण झाले आहे.  शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘आयटम साँग’ केल्यानंतर आता सलमान खानच्या चित्रपटातही ती झळकणार आहे. सनीला बहुतांश कार्यक्रमांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये पती डॅनियलसोबतच पाहिलं गेलं. या कार्यक्रमांमध्ये डॅनिअलला घेऊन जाण्यामागे एक विशेष कारण आहे. पती डॅनिअल का सतत सावलीप्रमाणे सनीच्या सोबत वावरत असतो, याचा खुलासा स्वतः सनीने केला आहे. याचे कारण खळबळजनक आहे. 

काय म्हणाली सनी... 
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी एक पॉर्नस्टार होती. इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, ‘त्यावेळी बॉलिवूड स्टार्स माझ्यापासून लांब पळायचे. इतकंच नाही तर फक्त हाय-हॅलो करण्यासाठीही ते कचरत होते. जेव्हा पहिल्या चित्रपटानंतर मी एका पुरस्कार सोहळ्यात गेले तेव्हा अनेक कलाकारांनी माझ्यासोबत बसण्यास आणि फोटो काढण्यासही नकार दिला. होता.’ अतिशय कटू अनुभव आल्याचे सनीने सांगितले. 

सनीच्या शेजारीसुद्धा उभे राहायचे नाहीत बॉलिवूड स्टार्स, वाचा पुढील स्लाईडवर... 
बातम्या आणखी आहेत...