आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीने वाढवले मानधन, \'...मस्ती\'साठी मागितले 3 कोटी, जाणून घ्या याआधीची फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सनी लिओन)
मुंबई- पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास गाठणारी सनी लिओनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सनी बॉलिवूडची सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. बेबी डॉल फेम सनी सध्या 'एक पहेली लीला'चे प्रमोशन करण्यात बिझी आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रेक्षकांमध्ये वाढती लोकप्रियता पाहून सनीने आपले मानधनात वाढ केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, 'ग्रँड मस्ती'च्या निर्मात्यांनी सनी या सिनेमाच्या सीरीजचा भाग बनण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र सनीने तब्बल तीन कोटींची मागणी करून सर्वांना आश्चर्यात पाडले.
'मस्ती' सीरीजचा तिसरा भाग 'ग्रँड मस्ती रिटर्न्स'मध्ये विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदसानी मुख्य भूमिकेत आहेत. सांगितले जाते, की सिनेमामध्ये टि्वस्ट आणण्यासाठी सनी लिओनला अप्रोच करण्यात आले होते. परंतु सनीने तीन कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर निर्मात्यांनी आता दुस-या अभिनेत्रीला घेण्याचा विचार केला आहे.
असे पहिल्यांदाच घडत नाहीये, की सनी इतक्या मोठ्या रकमेची मागणी करतेय. यापूर्वीसुध्दा तिने आयटम नंबर आणि सिनेमांसाठी इतक्या रकमेची मागण्या केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या आयटम नंबर आणि जाहिरातीसाठी किती मानधन घेते सनी लिओन...