आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अतिशय क्यूट दिसायची सनी लिओनी, अॅडल्ट इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बदलले होते नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सनी लिओनीच्या आगामी 'बेईमान लव' या सिनेमातील 'मैं अधुरा' हे गाणे अलीकडेच रिलीज करण्यात आले. या गाण्यात सनी तिचा को-स्टार रजनीश दुग्गलसोबत दिसत आहे. हा सिनेमा सनीच्या करिअरमधील दहावा सिनेमा आहे. सनीचा जन्म 1981मध्ये सर्निया ओंटारिया, (कॅनडा) येथे एका पंजाबी कुटंबात झाला. बालपणी तिला हॉकी आणि आइस स्केटिंग करणे पसंत होते. सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. अॅडल्ट करिअरमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने आपले नाव सनी ठेवले. तर लिओनी हे आडनाव पेंटहाउस मॅगझिनचे माजी संस्थापक बॉब गुसियोन यांच्या नावावरुन घेतले.

सनीचे आईवडील आता या जगात नाहीत. 2008 मध्ये आईचे तर 2010 मध्ये कॅन्सरमुळे तिच्या वडिलांचे निधन झाले. तिचा भाऊ संदीप वोहरा यूएकच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये शेफ आहे. 2011 मध्ये ती डेनियल वेबरसोबत विवाहबद्ध झाली. The Disparrows म्यूझिकल रॉक बँडचा लीड गिटारिस्ट डेनिअल सनीचा मॅनेजरसुध्दा आहे. डेनिअलच्या आई-वडील Massapequa (न्यूयॉर्क) मध्ये राहतात. सनी नेहमीच आपल्या सासू-सास-यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरीत कामाला होती. सनीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर 2003मध्ये तिने विविड एंटरटेन्मेंटसोबत तीन वर्षांचा करार केला, हार्डकोर पोर्नोग्राफीच्या जगात पाऊल ठेवले. सनीने अनेक पोर्न सिनेमांत काम केले. तिने जवळपास 35 अॅडल्ट सिनेमे केले, तसेच 25 सिनेमे दिग्दर्शित केले. करिअरच्या सुरुवातीला ती लेस्बिअन पोर्न सिनेमांत काम करत होती.
'बिग बॉस'नंतर झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री...
सनीने 2011 मध्ये कलर्स वाहिनीच्या 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. येथून तिला बॉलिवूडची दारं उघडी झाली. या शोच्या एका एपिसोडमध्ये महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. येथेच त्यांनी सनीला त्यांच्या सिनेमाची ऑफर दिली. मात्र सनीचा पदार्पणातला सिनेमा फ्लॉप ठरला. 'जिस्म 2' या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र हळूहळू सनी येथे स्थिरावली. 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ-कुछ लोचा है' (2015), 'मस्तीजादे' (2016), 'वन नाइट स्टँड' (2016) या सिनेमांध्ये ती झळकली. शिवाया 'स्प्लिट्सविला' या टीव्ही शोचे सातवे आणि आठवे सिझन तिने होस्ट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनी लिओनीचे बालपणीचे आणि फॅमिलीसोबतचे खास PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...