आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनीवर आली हॉटेलमध्ये राहण्याची वेळ, सेलिना जेटलीने रिकामे करुन घेतले घर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी लिओन)
मुंबईः पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन आता अडचणीत सापडली आहे. मुंबईत ज्या घरात ती वास्तव्याला होती, ते घर तिच्याकडून रिकामे करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे तिच्यावर हॉटेमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
बातम्यांनुसार, आपल्या अॅडल्ट स्टार इमेजमुळे सनीला मुंबईत स्वतःचे घर खरेदी करण्यात अनेक अडचणी येत आहेत. याच कारणामुळे ती अभिनेत्री सेलिना जेटलीच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होती. सेलिनाने सनीची अडचण लक्षात घेऊन तिला आपल्या फ्लॅट भाड्याने दिला होता. मात्र आता सेलिनाने सनीला घर रिकामे करण्यास सांगितले. याचे कारण म्हणजे, सेलिनाच्या मते सनी तिच्या फ्लॅटची नीट काळजी घेत नाहीये.
सूत्रांच्या मते, सेलिनाने काही दिवसांपूर्वी आपल्या फ्लॅटमध्ये (ज्यामध्ये सनी वास्तव्याला होती) सरप्राईज भेट दिली. त्यावेळी फ्लॅटमधील वॉशरुम बघून ती हैराण झाली. इतकेच नाही तर बाल्कनीतील फर्निचरलासुद्धा किड लागलेली तिला दिसली. आपल्या फ्लॅटमध्ये पसरलेली घाण बघून तिचा पारा चढला आणि तिने तातडीने सनीला घर रिकामे करण्यास सांगितले.
आता पतीसोबत हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे सनी
सेलिनाने घर रिकामे करुन घेतल्यानंतर आता सनी आपल्या पतीसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. खरं तर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरल्यानंतरसुद्धा सनीला मुंबईथील रेसिडेंशिअल परिसरात भाड्याने किंवा खरेदी करण्यासाठी प्रॉपर्टी मिळत नाहीये. याचे कारण ठरले आहे तिची पोर्न स्टारची इमेज.