आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनला आता व्हायचंय आई, पहिल्या बाळाच्या आहे प्रतिक्षेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : नवरा डेनियल वेबरसोबत सनी लिओन - Divya Marathi
फाइल फोटो : नवरा डेनियल वेबरसोबत सनी लिओन
मुंबईः पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनला आता आई व्हायचे आहे. एका प्रसिद्ध एन्टरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सनीने ही इच्छा व्यक्त केली आहे. सनी म्हणाली, ''आम्हा दोघांना (सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर) आता बाळाची इच्छा आहे. यासाठी आम्ही योग्य वेळेची प्रतिक्षा करत आहोत. माझ्या सासूबाईंनी नुकतीच माझ्याकडे तक्रार केली, की त्यांना आता नात किंवा नातू हवाय आणि आणि आम्ही त्यांची ही इच्छा पूर्ण करत नाहीये.''
नवरा आहे बेस्ट फ्रेंड
सनी लिओन तिचा नवरा डेनियल वेबरला आपला बेस्ट फ्रेंड समजते. ती म्हणते, ''चांगल्या आणि वाईट काळात आम्ही कधीही एकमेकांची साथ सोडत नाही. मी प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला घेते. मी त्याच्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही.''
डेनियलच्या हातात सनीचे कंट्रोल
डेनियल सनीच्या नव-यासोबतच तिचा मॅनेजरदेखील आहे. आपले सर्व काम डेनियल सांभाळत असल्याचा आनंद सनीला आहे. ती म्हणते, ''मला वाटतं, की एका कलाकाराल जी संधी मिळायला हवी, ती मला मिळाली आहे. काय करावे आणि काय करु नये, या निर्णय मी आणि डेनियल सोबत घेत असतो.''
Bigg Boss मध्ये डेनियलमुळेच आले
सनी सांगते, मी आज जे यश मिळवले आहे, ते केवळ माझ्या नव-यामुळे. 'बिग बॉस'मध्ये येण्याच्या निर्णयामध्ये डेनियलनेच तिची मदत केली होती. 2011 मध्ये सनी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. वाइल्ड कार्डच्या माध्यमातून तिची ही एन्ट्री झाली होती. बिग बॉसच्या घरातच दिग्दर्शक महेश भट यांनी सनीला तिच्या करिअरमधील पहिला बॉलिवूड सिनेमा ऑफर केला होता. 'जिस्म 2' नंतर सनी 'जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहेली लीला' आणि 'कुछ कुछ लोचा है'मध्ये झळकली होती. आता तिचा आगामी 'मस्तीजादे' हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, डेनियल वेबरसोबतचे सनीचे रोमँटिक क्षण...
बातम्या आणखी आहेत...