एंटरटेनमेंट डेस्क - बॉलीवूडमध्ये 'बेबी डॉल' ते 'लैला' असा प्रवास करणारी सनी लिओनी हिने वयाची 36 वर्षे पू्र्ण केली आहेत. बिग बॉस या रियालिटी शोच्या माध्यमातून भारतातील एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये सनीने एंट्री घेतली. त्यानंतर विविध चित्रपटांच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये स्थान निश्चित केले आहे. सनीचे चित्रपट फार गाजत नसले तरी सनीच्या करिअरला मात्र वेग मिळत आहे. विशेषतः सिनेमामध्ये आयटम साँग असल्यास सनीच्याच नावाचा आधी विचार होतो, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
एकूणच सनी लिओनी चांगलीच बिझी असल्याने तिचे शुटिंग बऱ्याचदा उशीरापर्यंत सुरू असते. त्याचबरोबर अनेक इव्हेंट्समध्ये तिला उपस्थिती लावावी लागते. त्यामुळे सनीला स्वतःसाठी क्वालिटी टाइम मिळत नाही. त्यामुळे प्रवासादरम्या, शुटिंगच्या ऑन लोकेशन किंवा कार्यक्रमांच्या बॅकस्टेज सनी ही कमी भरून काढते. याठिकाणी सनीची अनेकदा मस्ती पाहायला मिळते. सनीचे असेच काही ऑन लोकेशन आणि बॅकस्टेज किंवा कार्यक्रमातील फोटो आपण आज पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सनी लिओनीचे काही ऑनलोकेशन आणि बॅकस्टेज PHOTOS..