आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी सेलिनाच्या घरात भाड्याने राहायची सनी, अस्वच्छतेमुळे काढले होते घराबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 36 वर्षीय अभिनेत्री सनी लिओनी 2015 साली अचानक चर्चेत आली होती. त्यावेळी घडलेली घटना म्हणजे, अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिला घराबाहेर काढले होते. सनी मुंबईत आल्यानंतर तिला येथे राहायला घर मिळत नव्हते. त्यावेळी सेलिना तिच्या मदतीला धावून आली आणि तिने तिचे मुंबईतील अधेंरी परिसरात असलेले पेंट हाऊस सनी आणि तिचा नवरा डेनियल यांना भाड्याने राहायला दिले. पण सनी आणि डेनियल यांनी घर अतिशय घाण केल्याने सेलिनाने त्यांना घर रिकामे करायला सांगितले होते. त्यामुळे अनेक दिवस दोघांना हॉटेलमध्ये राहावे लागले होते.  

- एका मुलाखतीत सेलिनाने म्हटले होते, ''त्यांनी माझे पेंटहाऊस उद्धवस्त केले. घरात प्रवेश केल्यानंतर जणू येथे वादळ उठले होते, असे चित्र पाहायला मिळाले. माझे संपूर्ण अँटिक फर्निचर मोडकळीस आले. टीकपासून तयार करण्यात आलेले शेल्फसुद्धा तुटलेले दिसले. माझी परवानगी न घेता घरातील भिंतींना छिद्र पाडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. फ्रिज आणि वॉशिंग मशीनचेही नुकसान झाले आहे. सनी आणि तिचा नवरा मुळीच स्वच्छता बाळगत नाहीत.'' 
- सेलिनाने सनी आणि डेनियल यांच्याविरोधात लीगल अॅक्शन घेतली होती. शिवाय डिपॉझिटच्या रकमेतून नुकसानभरपाई घेतली होती.

वर्षभरापूर्वी सनीने मुंबईत खरेदी केला 3 BHK फ्लॅट
- सनी आणि डेनियल यांनी वर्षभरापूर्वीच मुंबईतील जुहू परिसरात एक घर खरेदी केले आहे.
- या घराविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रिपोर्ट्सनुसार, त्यांचे हे घर 3 BHK फ्लॅट आहे.

इंटरनेटवर सनीच्या घराचे अनेक फोटोज उपलब्ध आहेत. यापैकी काही फोटोजमध्ये ती एकटी दिसतेय, तर काहींमध्ये तिचा नवरा तिच्यासोबत दिसतोय. यापैकी काही फोटोज हे सनीच्या मुंबईतील घराचे तर काही परदेशातील घराचेही असल्याचे म्हटले जात आहे. सनीच्या घराचे 9 फोटोज तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता.
नोट : divyamarathi.com यापैकी एकही फोटो खरा असल्याचा दावा करत नाही. सर्व फोटोज मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर येथे घेण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...