आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Shoots Down Rakhi Celina Comment, But Politely.

राखी आणि सेलिनाच्या कमेंट्सवर सनी लिओनने दिला खरमरीत उत्तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- राखी सावंत, सेलिना जेटली, स्पटि्सव्हिलाच्या इव्हेंटदरम्यान सनी लिओन)
मुंबई- अभिनेत्री सनी लिओनने स्पटि्सव्हिलाच्या नवीन पर्व बुधवारी (1 जुलै) लाँच झाले. यानिमित्त सनी लिओनने राखी सावंत आणि सेलिना जेटली यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर खरमरीत उत्तर दिले. सनी म्हणाली, 'त्या विनाकारण कमेंट्स करत आहेत. त्या अनप्रोफेशनल आहेत. तुम्ही कधीच कोण्त्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीला असे बोलताना पाहिले नसेल आणि पाहणार नाहीत. मी इथे चांगले काम करण्यासाठी आले आहे आणि असा कमेंट्सना मी दुर्लक्षित करते.'
राखी सावंतने सनीवर टिका केली होती, की ती जिथून आली आहे, तिथे परत जावे. तसेच सेलिनाने सनी आणि तिचा पती डेनिअल वेबरवर आरोप लावला होता, की सनीने तिचे भाड्याने घेतलेले घर खराब करत आहे. नंतर सेलिनाने सनीला घराबाहेरसुध्दा काढले होते.
तसे पाहता, स्पटि्सव्हिलाच्या आठव्या पर्वातच्या लाँचवेळी सनीसोबत तिचा को-होस्ट रणविजय सिंहसुध्दा उपस्थित होता. यावेळी रणविजयने तिचा प्रशंसासुध्दा केली. सनीची प्रशंसा करताना रणविजय म्हणाला, 'सनी खूपच छान, शांत आणि आनंदी राहणारी व्यक्ती आहे. आतापर्यंत मी जेवढ्या लोकांसोबत काम केले, त्यामध्ये मला सनीची कंपनी खूप आवडली.' सोबतच रणविजयने असेही सांगितले, की सनी आणि त्याची पत्नी प्रियांकाची मैत्री पाहून त्याला असुरक्षितता वाटते.
रणविजय पुढे म्हणाला, 'सनी लिओन आणि प्रियांका खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा रात्री डिनरसाठी बाहेर जातात. मी सनी आणि प्रियांकाच्या मैत्रीने असुरक्षित झालो आहे.' सनी लिओन आणि रणविजय 4 जुलैपासून एमटीव्हीवर टेलिकास्ट होणा-या 'स्पटि्सव्हिला सीजन-8' होस्ट करताना दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाँचिंगदरम्यानची सनी लिओन आणि रणविजय सिंहची छायाचित्रे...