आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी म्हणाली, पूर्वी लठ्ठ म्हणून मिळायचा नकार; पाहा कसा होता तेव्हाचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनी लिओनी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. याठिकाणी ती 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे. तिचे डिझायनर अर्चना कोचरसाठी रँप वॉक केला. विशेष म्हणजे 'न्यूयॉर्क फॅशन वीक' मध्ये रॅम्प वॉक करणारी ती पहिली बॉलीवूड अॅक्ट्रेस बनली आहे. पण मॉडेल म्हणून तिचे सुरुवातीचे अनुभव फारसे चांगले नव्हते. सनीने स्वतःच याबाबत सांगितले आहे.

काय म्हणाली सनी..
सनीने जेव्हा मॉडेलिंगला सुरुवात केली त्यावेळी तिला लठ्ठ असल्यामुळे नकार दिला जात होता. विशेष म्हणजे सनी बॉलीवूडमधील आजच्या सक्सेसफुल अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. चित्रपटांत येण्यापूर्वी पोर्न स्टार म्हणून ओळखले जात होते. या दरम्यान ती मॉडेलिंगही करायची. विशेष म्हणजे पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती एका जर्मन बेकरीत काम करत होती.

'बिग बॉस'मधून मिळाली एंट्री..
सनी लियोनीने 2011 मध्ये कलर्स चॅनलच्या कॉन्ट्रोव्हर्शिअल रियालिटी शो 'बिग बॉस'च्या सीझन 5 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. तोच तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये एंट्रीचा मार्ग बनला. शोच्या एका एपिसोडदरम्यान डायरेक्टर महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. सनीला त्यांनी त्याचवेळी अपकमिंग चित्रपटासाठी सलेक्ट केले होते. मात्र तिला पदार्पणात फारसे यश मिळाले नाही.

'जिस्म 2' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. पण सनीचे बॉलीवूडमधील करिअर मात्र सुरू झाले. सनी 'मस्तीजादे' (2016), 'वन नाइट स्टँड' (2016), 'कुछ कुछ लोचा है'(2015), 'एक पहेली लीला'(2015) आणि 'जॅकपॉट' (2013) सारख्या चित्रपटांत तिने काम केले आहे. 2014 मध्ये रिलीज झालेला 'रागिणी एमएमएस 2' तिचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला.

पुढील स्लाइड्सवर पाहा सनीचे सुरुवातीच्या काळातील काही PHOTOS...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...